लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. यासह या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी लाल रंगाची कॅप घालून निधी गोळा करण्याचे ठरवले होते. आता त्यासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा झाला आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी संपूर्ण मैदानात लाल रंग पसरला होता. इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस याची पत्नी रूथ स्ट्रॉस हीचा २०१८ मध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर अँड्र्यू स्ट्रॉसने या रोगाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी रूथ स्ट्रॉस फाउंडेशनची स्थापना केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान तब्बल १२ कोटींचा निधी गोळा करण्यात आला आहे.(Ruth Strauss foundation raised 12 crore during second test)
“The biggest thanks of all goes to you who have contributed to our cause”
A message of appreciation from Sir Andrew Strauss after a monumental week ♥️#ENGvIND | #RedForRuth pic.twitter.com/TaQLNBmOxg
— Ruth Strauss Foundation (@RuthStraussFdn) August 16, 2021
ब्रिटनमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोग होणे सामान्य गोष्ट आहे. १८ वर्षांखालील ४१,००० पेक्षा जास्त मुले आई किंवा वडीलांच्या निधनामुळे प्रभावित होत असतात. अँड्र्यू स्ट्रॉस यांनी म्हटले की, “हे फाऊंडेशन त्या मुलांना आणि कुटुंबांना मदत करेल. तसेच अशा प्रकारच्या कसोटी सामन्यांमध्ये फाऊंडेशनचा प्रचार केल्यामुळे, फाऊंडेशनला अधकाधिक मदत मिळेल.”
यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅग्राने देखील हे कार्य हाती घेतले होते. त्याच्या पत्नीचा देखील कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.
लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने मिळवला १५१ धावांनी विजय
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते.त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही.
अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पाकिस्तानविरुद्ध; अशी असेल स्पर्धेची रूपरेखा
तिसऱ्या कसोटीत ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळणार टीम इंडियातून डच्चू?
‘मोहम्मद सिराज हा रिषभ पंतचा गोलंदाजीमधला अवतार’, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुक