दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा फॉर्मात असलेला फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतीमुळे संपूर्ण टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थित प्रभारी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या केएल राहुल यालाही दुखापतीने घेरले असल्याने तोदेखील संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. अशात राहुलच्या जागी रिषभ पंतकडे नेतृत्त्वपद दिले गेले आहे. परंतु राहुलची सलामीची जागा कोण भरून काढेल?, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (०८ जून) राहुलच्या (KL Rahul) दुखापतीबद्दल (KL Rahul Injury) अधिकृत माहिती दिली. बीसीसीआयने ट्वीट करत सांगितले की, “उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून (KL Rahul Ruled Out Of T20 Series) बाहेर पडला आहे. त्यामुळे रिषभ पंत संघाचे नेतृत्त्व करेल.” मात्र राहुलच्या अनुपस्थितीत भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी कोण येईल, या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत क्रिकेटप्रेमी आहेत.
KL Rahul has been ruled out of the T20I series against South Africa owing to a right groin injury while Kuldeep Yadav will miss out in the T20I series after getting hit on his right hand while batting in the nets last evening.
More details here – https://t.co/KDJwRE9tCz #INDvSA
— BCCI (@BCCI) June 8, 2022
कोण देणार केएल राहुलच्या जागी सलामी?
राहुलसोबत युवा क्रिकेटपटू ईशान किशन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात डावाची सुरुवात करणे जवळपास निश्चित होते. मात्र आता राहुल टी२० मालिकेतून बाहेर झाल्यानंतर त्याची जागा युवा ऋतुराज गायकवाड घेऊ शकतो. ऋतुराजला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीला फलंदाजी करण्याचा अनुभव आहे.
तसेच ऋतुराजला भारताच्या टी२० संघाकडून ३ सामने खेळण्याचा अनुभव आहे. मात्र त्याला या संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने या ३ सामन्यांमध्ये १३ च्या सरासरीने केवळ ३९ धावा केल्या आहेत. त्याने त्याचा शेवटचा टी२० सामना फेब्रुवारी २०२२ मध्ये खेळला होता. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा ‘हा’ नियम बदलला
रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल
INDvsSA। पहिल्या सामन्यासाठी रिषभ पंत देऊ शकतो ‘या’ खेळाडूंना संधी