इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पंधराव्या हंगामात धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला आहे. तो साध्या दुहेरी धावा करण्यासाठीही झगडत होता. परंतु रविवारी (१७ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने या सामन्यात आयपीएल २०२२ हंगामातील त्याचे पहिले अर्धशतक ठोकले आहे. विशेष म्हणजे, त्याच्या आई-वडिलांनी हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती, त्यामुळे कदाचित तो पुन्हा फॉर्मात परतला असावा.
ऋतुराज गायकवाडचे दमदार पुनरागमन
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल २०२१मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने १६ सामने खेळताना सर्वाधिक ६३५ धावा चोपल्या होत्या. यासोबतच त्याने ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले होते. मात्र, यंदाच्या हंगामातील त्याची काामगिरी खूपच खराब राहिली होती. या हंगामात त्याने ५ सामने खेळले असून त्यात त्याने केवळ ३५ धावा केल्या होत्या. परंतु आता गुजरातविरुद्धची त्याने धडाकेबाज प्रदर्शन केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
चेन्नईकडून सलामीला फलंदाजीला येत त्याने ४८ चेंडूंमध्ये ७३ धावा (Ruturaj Gaikwad Half Century) फटकावल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने १५२.०८ च्या स्ट्राईक रेटने ५ षटकार आणि ५ चौकारही मारले होते. हे त्याचे चालू हंगामातील पहिलेवहिले अर्धशतक आहे.
हा सामना पाहण्यासाठी ऋतुराजचे कुटुंबीय पुण्याच्या स्टेडियमवर आले होते. त्याचे वडिल दर्शत गायकवाड, त्याची आई सविता गायकवाड व बहिणीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ऋतुराजचे कुटुंबीय (Ruturaj Gaikwad Family) प्रत्यक्षात त्याला चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये (Ruturaj Gaikwad Family In Pune Stadium) उपस्थित होते. ऋतुराजने आपल्या कुटुंबीयांसोबतचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
मास्टर ब्लास्टरशी केली ऋतुराजने बरोबरी
सुरुवातीच्या पाचही सामन्यांमध्ये दुहेरी धावसंख्या करण्यासाठीही झगडणारा ऋतुराज (Ruturaj Gaikwad) गुजरातविरुद्ध (Gujrat Titans vs Chennai Super Kings) चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. पुण्याच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात त्याने ७३ धावा फटकावत आयपीएलमधील एका विक्रमात सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याची बरोबरी (Equals Sachin Tendulkar) केली आहे. आयपीएलमध्ये २८ डाव खेळताना ९०० पेक्षा जास्त धावा करणारा ऋतुराज सचिननंतर केवळ दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये २८ डावांमध्ये ९४७ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दोघांच्या समान विकेट्स, पण तरीही टी नटराजन ऐवजी युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कशी? वाचा काय आहे नियम
VIDEO: उमरानच्या चेंडूवर झाला ड्रामा; लिव्हिंगस्टोन भिडला पंचांशी