रविवारी (दि. १७ एप्रिल) आयपीएल २०२२चा पहिला डबल हेडर सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या आयपीएलच्या २८व्या सामन्यात हैदराबाद संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील सलग चौथा विजय होता. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार उमरान मलिक ठरला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात पंजाबसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीत दरम्यान त्याने मारलेल्या एका षटकारामूळे विरोधी कर्णधार केन विलियम्सन चांगलाच अचंबित झाला.
लियाम लिव्हिंगस्टोनचा गगनचुंबी षटकार
प्रमुख खेळाडू एका बाजूने बाद होत असताना लियाम लिव्हिंगस्टोनने दुसऱ्या बाजूने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. त्याने आपले अर्धशतक साजरे केले. मात्र, पंजाबच्या डावात बाराव्या षटकात त्याने एक असा षटकार मारला, ज्यामुळे विरोधी कर्णधारासह पंजाबच्या डग आऊटमध्ये देखील अनेकांना आश्चर्य वाटले.
बाराव्या षटकातील तिसरा चेंडू सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने १४५ पेक्षा जास्त वेगाने टाकला. फुल फॉर्ममध्ये असलेल्या आणि गगनचुंबी षटकार मारण्यात वाकबगार असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने मिड विकेटच्या दिशेने तब्बल १०६ मीटर लांबीचा षटकार ठोकला. त्याचा हा षटकार पाहून सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन तसेच पंजाबच्या डग आऊटमध्ये बसलेले शिखर धवन व अनिल कुंबळे हे देखील चकित झाले. यापूर्वी त्याने १०८ मीटर लांबीचा षटकार देखील खेचला आहे.
https://twitter.com/keshxv1999/status/1515666590049611782?t=q_hXQ8K7f-Ex99hJKc1eGQ&s=19
लिव्हिंगस्टोनने या सामन्यात ३३ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६० धावा कुटल्या.
हैदराबादचा चौथा विजय
या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मयंक अगरवालच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार बनलेल्या शिखर धवनच्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकात सर्वबाद १५१ धावा केल्या आणि हैदराबादला १५२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने १८.५ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-
दोघांच्या समान विकेट्स, पण तरीही टी नटराजन ऐवजी युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कशी? वाचा काय आहे नियम
दिल्ली संघात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड होतंय Cancel IPL, मीम्सला आलेय उधाण