टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन भारतीय संघाच्या शिलेदारांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला राम राम ठोकला. विराट कोहलीने यंदाच्या टी20 विश्वचषकात सलामी केली. परंतु आधिकतम टी20 सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केला आहे. तर क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फाॅरमॅटमध्ये भविष्यात तिसऱ्या क्रमाकांवर कोण फलंदाजी करणार याची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान झिम्बाब्वे दाैऱ्यावर पहिल्या दोन टी20 सामन्यात ऋतुराज गायकवाडने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी केला आहे. ज्यमध्ये त्याने पहिल्या सामन्यात 7 तर दुसऱ्या सामन्यत 77 धावा केल्या आहेत.
तर कोहलीच्या तिसऱ्या फलंदाजी करण्यासाठी ऋतुराज गायकवाडची नजर तर नाही ना? तर ऋतुराजने स्वत: या बद्दल भाष्य केले आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना तो म्हणाला की, “विराट भाईशी तुलना करण्याचा विचार करणे किंवा त्याचे जागा भरण्याचा प्रयत्न करणे देखील तुलनेने कठीण आणि खूप कठीण आहे, जसे मी आयपीएल दरम्यान सांगितले होते, माही भाईचे जागा भरणे कठीण आहे. तुम्हाला स्वतःची सुरुवात करायची आहे. करिअर, तुमचा स्वतःचा खेळ खेळायचा आहे. आणि माझे आता तेच प्राधान्य आहे.
Ruturaj said “It isn’t right to think to compare with Virat bhai or even try to fill his shoes is relatively very tough & hard, as I said during IPL, it is difficult to fill Mahi bhai’s shoes. You want to start your own career, play your own game & that is the priority now”. pic.twitter.com/LtjvNFNXLI
— Johns. (@CricCrazyJohns) July 9, 2024
ऋतुराज गायकवाडने या ठिकाणी धोनीचा उल्लेख या साठी केला आहे की त्या दोघांची तुलना आयपीएल मध्ये करण्यात आली होती. वास्तविक गायकवाड यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता. एम एस धोनीने ट्राॅफी जिंकून संघाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती. दरम्यान भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 टी20 सामन्यांमधील तिसरा टी20 सामना बुधवारी(10 जुलै) होणार आहे. तर ही सध्या मालिका 1-1 च्या बरोबरीत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
सिराजचं नशीब चमकलं, भेटी दरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी केली खास घोषणा
“मी खूप भाग्यवान…”, रोहित शर्माची गुरु राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट
आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा, भारताच्या ‘या’ खेळाडूनं मारली बाजी