डर्बन । शुक्रवारी (14 फेब्रुवारी) किंग्समेड (Kingsmead) येथे इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील दुसरा सामना (2nd Match of T20I) पार पडला. या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 2 धावांनी विजय मिळविला. त्याचबरोबर मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton de Koke) विक्रम केला आहे. यावेळी डी कॉकने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाकडून करण्यात आलेले हे सर्वात जलद अर्धशतक (Fastest 50) आहे.
ही कामगिरी करत डी कॉकने एबी डिविलियर्सला (AB de Villiers) तसेच स्वत:च्या विक्रमाला मागे टाकले आहे. यापूर्वी डिविलियर्स आणि डिकॉक यांच्या नावावर संयुक्तरित्या दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम होता.
डिविलियर्सने फेब्रुवारी 2016 मध्ये जोहान्सबर्ग येथे इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यात 21 चेंडूत अर्धशतक केले होते. विशेष म्हणजे 1 महिन्यानंतर डिकॉकने डिविलियर्सच्या या विक्रमाची बरोबरी केली होती. त्याने मार्च 2016ला मुंबईत खेळताना इंग्लंड विरुद्धच टी20 विश्वचषकात 21 चेंडूत अर्धशतक केले होते.
काल दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना डीकॉकने 22 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये 2 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 2007 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डर्बन येथेच मैदानावर अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक केले होते.
त्याचबरोबर या यादीत ऑस्ट्रियाचा मिर्झा एहसान (13 चेंडू) (Mirza Ahsan) दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो (14 चेंडू) (Colin Munro) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अनिल कुंबळेकडून गोलंदाजीचे धडे गिरवण्यास युवा भारतीय संघाचा 'हा' खेळाडू उत्सुक
वाचा- ????https://t.co/qlXI56REI3????#म #मराठी #Cricket #TeamIndia @anilkumble1074— Maha Sports (@Maha_Sports) February 15, 2020
या कारणामुळे घडली चेंडू छेडछाडीची घटना, रिकी पाँटिंगने केला खूलासा
वाचा- ????https://t.co/wakw6sZziF????#म #मराठी #Cricket #Australia @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020