दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा (sa vs ind test series) तिसरा सामना शुक्रवारी (१४ जानेवारी) पार पडला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका देखील २-१ ने नावावर केली. मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज किगन पीटरसनने (Keegan Petersen) अप्रतिम प्रदर्शन केले. पीटरसनचे प्रदर्शन पाहून भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) देखील त्याचे चाहते बनले आहेत.
२८ वर्षीय किगन पीटरसनने या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. केपटाऊन कसोटीत त्याने पहिल्या डावात ७२ आणि दुसऱ्या डावात ८२ धावा ठोकल्या. या संपूर्ण मालिकेतील त्याच्या फलंदाजीचा विचार केला, तर त्याने २७६ धावा केल्या आहेत. या खेळीसाठी त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. शास्त्रींनी एक खास ट्वीट करून पीटरसनचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक खास ट्वीट करत पीटरसनचे कौतुक केले आणि त्यांच्या लहानपणीच्या आवडत्या खेळाडूशी त्याची तुलना देखील केली. शास्त्रींनी ट्वीटमध्ये लिहिले की, “किगन पीटरसन, एक जागतिक पातळीवरील खेळाडू तयार होत आहे. माझ्या लहानपणीचा हिरो गुंडप्पा विश्वनाथनची आठवण आली.”
ट्वीटमध्ये शास्त्रींनी पीटरसनच्या नावाचे लहान रूप ‘केपी’ असे केले आणि ही अक्षरे छान आहेत, असेही म्हटले. इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरनस यालाही ‘केपी’ या नावाने ओळखले जाते. शास्त्रींना केविन आणि किगन यांची एकमेकांसोबत तुलना करण्यासाठी केविन पीटरसनला देखील ट्वीटमध्ये मेंशन केले आहे.
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1481958490889682945?s=20
दरम्यान, केपाटाऊनमधील तिसऱ्या कसोटीचा विचार केला, तर यामध्ये दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. दक्षिण अफ्रिकेने हे लक्ष्य अवघ्या तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले. तत्पूर्वी, पहिल्या डावात भारताने २२३ आणि अफ्रिकेने २१० धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारतीय संघ १३ धावांनी आघाडीवर होता आणि त्यानंतर दुसऱ्या डावात संघ १९८ धावांवर गुंडाळला गेला होता.
महत्वाच्या बातम्या –
उशीरा सुचलेले शहाणपण! डीआरएस वादावर विराट म्हणतोय…
VIDEO: मालिका गमावल्यावर विराटकडून आली सर्व प्रश्नांची उत्तरे; पाहा काय म्हणाला कर्णधार
तब्बल तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा किल्ला अभेद्य! सात भारतीय कर्णधार परतलेत रिकाम्या हाताने
व्हिडिओ पाहा –






