मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने २२ एप्रिल १९९८ रोजी शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोको- कोला कप स्पर्धेत ६व्या सामन्यात शानदार खेळी करताना १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. यात सचिनने ९ चौकार व ५ षटकारांची बरसात केली होती. २३ वर्ष होऊनही या खेळीला कुणी विसरले नाही. तेव्हा सचिनला आपला २५वा वाढदिवस साजरा करायला २ दिवस बाकी होते.
२५ वर्षीय सचिनच्या नावावर क्रिकेटमध्ये तेव्हा फार काही विक्रम नव्हते. त्यातील काही निवडक गोष्टी
-सचिनचे तेव्हा वय २४ वर्ष व ३६३ दिवस होते. तर ९ वर्षांची त्याची क्रिकेट कारकिर्द होती.
-७८५ गुणांसह सचिन तेंडूलकर तेव्हा वनडे क्रमवारीत ६व्या स्थानी होता तर ८९२ गुणांसह ब्रायन लारा अव्वल स्थानी विराजमान झाला होता. या मालिकेनंतर ८४६ गुणांसह सचिन तिसऱ्या स्थानावर आला होता.
-तेव्हा सचिनच्या नावावर वनडेत १८७ सामन्यात १८१ डावात ३९.५२च्या सरासरीने ६५२२ धावा केल्या होत्या. यात त्याने १४ शतक व ४० अर्धशतकं केली होती.
– वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेव्हा ९वा तर भारतीयांमध्ये अझरनंतर (८०६५) दुसरा होता. वनडेत सर्वाधिक धावांचा विक्रम तेव्हा डेसमाॅंड हाईन्स (८६४८) या फलंदाजाच्या नावावर होता.
-तेव्हा कसोटीत सचिनने ६१ सामन्यात ५४.८४च्या सरासरीने ४५५२ धावा केल्या होत्या. २५ वर्षीय सचिनच्या नावावर तेव्हा १६ कसोटी शतके होती.
– तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने एकूण ३० शतके केली होती व तेव्हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम हा सुनिल गावसकर, व्हिव्हियन रिचर्ड व डेसमाॅंड हाईन्स यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी ३५ शतके केली होती. तर त्यानंतर ३१ शतकांसह जावेद मियाॅंदाद चौथ्या स्थानी होता. बाकी सचिन २ खेळाडूंसह पाचव्या स्थानी होता.
-तेव्हा २० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांपेक्षा अधिक धावा केल्या होत्या व सचिन तेव्हा १४व्या स्थानी होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत चेन्नईची टर उडवणारा ‘हा’ पठ्ठ्या आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
पराभवातही मुंबईचीच ‘सत्ता!’ आयपीएल इतिहासातील सर्वात लाजीरवाणा विक्रम पाच वेळच्या विजेत्याच्या नावे
‘यांच्यापेक्षा तर उनाडकटच भारी!’, रोहित अन् इशानची खेळी पाहून संतापले नेटकरी, होतायत जोरदार ट्रोल