आज (७ ऑगस्ट) जागतिक मैत्री दिवस साजरा केला जात आहे. जे मित्र एकमेकांपासून दूर असतात ते या दिवशी एकमेकांना भेटतात. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे, असे सर्व मित्र तो बाजूला ठेवून आजच्या दिवशी एकत्र येतात. या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे मैत्रीचे उदाहरण दिसत नाही. जर खेळांमध्ये पाहिले तरीही अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील.
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल टेनिस कोर्टवर कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, परंतु मैदानाबाहेर दोघेही एकमेकांची पक्के मित्र आहेत. त्याचप्रमाणे क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचेही मैत्रीचे एक उदाहरण मानले जाते. आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त सचिन आणि कांबळीच्या मैत्रीबद्दलचे काही खास किस्से आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही एकाच शाळेमध्ये शिकत होते. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीची सुरुवातही शाळेतच झाली. मुंबई येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत हे दोघेही सातवीत शिकत होते, यानंतर या दोघांची मैत्री पुढे गेली. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत शिकत असताना रमाकांत आचरेकर यांच्या क्रिकेट कोचिंगमध्ये झाली होती. येथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांनी यांनी क्रिकेटचे बारकावे सचिन-कांबळी या दोघांना शिकवले होते.
त्याच बरोबर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेसाठी हॅरिस शील्ड स्पर्धेदरम्यान सचिन आणि कांबळीने भागीदारीचा इतिहास रचला होता. या स्पर्धेत झेवियर स्कूलविरुद्ध खेळताना त्यांनी ६६४ धावांच्या भागीदारीचा विश्वविक्रम रचला होता. या कामगिरीमुळे दोन्ही क्रिकेटपटूंना अगदी लहान वयातच प्रसिद्ध मिळाली होती.
त्यांच्या या विक्रमानंतर सचिन तेंडुलकरला १९८९ मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर १९९२ पर्यंत सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे तो चर्चेत देखील होता. तर १९९३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये विनोद कांबळे पदार्पण केले. त्यानेदेखील १४ कसोटी सामन्यांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या.
सचिन-कांबळी यांना वडपाव खूप आवडायचा
विनोद कांबळीच्या मतानुसार या दोघांनाही खायला वडापाव खूप आवडत होता. त्याचबरोबर या दोन्ही दिग्गज खेळाडूमध्ये वडापाव खाण्याची स्पर्धा सुरु व्हायची. असे देखील सांगितले जाते की, सचिन तेंडुलकर जेव्हा एका सामन्यात १०० धावा करत होता, तेव्हा कांबळी त्याला दहा मोठे वडापाव खाऊ घालत होता.
सचिनला हरवायला खूप मजा यायची
विनोद कांबळीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एकदा सांगितले होते की, मला सचिन तेंडुलकरला हरवायला खूप मजा येते. भलेही मग ते क्रिकेटचे मैदान असो किंवा शाळा असो. विनोद कांबळीच्या मतानुसार, सचिनला नेहमी पंजा लढवत ताकत दाखवण्याची खूप हौस होती.
https://www.instagram.com/p/CLqa_qhqPIp/
सचिन-कांबळीचे मार्ग वेगळे झाले
सचिन तेंडुलकर सतत क्रिकेटच्या यशाच्या शिखरावर पोहचला होता. त्याचवेळी विनोद कांबळी देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत करत होता. एकूणच कांबळी २००० पर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. या दरम्यान एका मुलाखतीदरम्यान कांबळी म्हणाला की, सचिनने त्याच्या कारकिर्दीत त्याला फारशी मदत केली नाही. मास्टर ब्लास्टर तेंडुलकर यावर खूप चिडला आणि नंतर त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
सचिन-कांबळी 8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एका पुस्तकाच्या प्रकाशनवेळी पुन्हा एकदा भेटले होते. त्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये आलेली अडी दूर झाली. या दरम्यान, कांबळी म्हणाला होता की, आमच्यातील राग-रुसवा निघून गेला आहे. त्याचबरोबर त्यांच्यात आलेला दुरावा देखील दूर झाला आहे. मला आनंद आहे की, आम्ही दोघे पुन्हा जवळ आलो आहोत. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि आमची मैत्री पुन्हा एकदा सरळ मार्गावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सिक्सर किंग’ रोहितची मोठी उडी, षटकारांच्या विक्रमात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरला केले ओव्हरटेक
शॉकिंग! नको त्या जागी चेंडू लागला आणि क्रिकेटपटूचा मैदानातच जीव गेला
वेस्ट इंडीज मोहिमही फत्ते! दणदणीत विजयासह टी२० मालिकाही टीम इंडियाच्या नावे