भारतीय संघाचा मास्टर-ब्लास्टर म्हणून ओळखला जाणार सचिन तेंडुलकर याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील त्याची लोकप्रियता काही कमी झाली नाहीये. ब्रिटनच्या प्रसिद्ध युगोव डेटा ॲनालिसिस फर्मने २०२१ मधील प्रशंसनीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरने टॉप खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याचे पाहायला मिळाले आहे.
जगभरातील खेळाडूंचा विचार करता, सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. युगोव डेटा ॲनालिसिस फर्मने २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
क्रीडा जगतात पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर, चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि पाचव्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा समावेश आहे.
तसेच भारतातील सर्वाधिक प्रशंसनीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर, सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंनी भारतासाठी अनेकवर्षे क्रिकेट खेळताना मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून हे खेळाडू भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू आहेत.
क्रीडा क्षेत्र सोडले, तर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २०२१ वर्षातील प्रशंसनीय व्यक्तीमत्त्वांच्या यादीत टॉप व्यक्तींमध्ये आहेत. परंतु, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा अजूनही या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. ते राष्ट्रपती नसले तरीदेखील त्यांची लोकप्रियता काही कमी झाली नाहीये. बराक ओबामा पहिल्या स्थानी, तर नरेंद्र मोदी आठव्या स्थानी आहेत. या यादीत टॉप १० मध्ये येणारे ते पहिलेच भारतीय आहेत.
महत्वाच्या बातम्या :
काळजाचा थरकाप उडवणारे ‘या’ दोनच कसोटी सुटल्या बरोबरीत; एकात भारतीय संघाचाही समावेश
सूर्यकुमारने आरसीबीविरुद्ध ‘मै हू ना’ सेलिब्रेशन? एक वर्षानंतर कारण उघड