---Advertisement---

नादखुळा कॅच! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केलंय ‘या’ कॅचचं कौतूक

On: रविवार, फेब्रुवारी 12, 2023 3:52 PM
Viral Video
---Advertisement---

भारतात क्रिकेट पाहणाऱ्यांची आणि क्रिकेट खेळणाऱ्यांची कमी नाही. भारतासारख्या मोठ्या देशात प्रत्येक शहरात, गावात आणि प्रत्येक गल्लीमध्ये क्रिकेटचा एखादा संघ असतोट.या संघात गुणवंत खेळाडूही मोठ्या प्रमाणात असतात. गावपातळीच्या अशाच एका गुणवंत खेळाडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या खेळाडूने एक असा झेल पकडला, जो पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील हैराण असल्याचे दिसते.

भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचे देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. पण प्रत्यक्षात देशासाठी खेळतान फक्त सर्वोत्तम 11 क्रिकेटपटू. स्पर्धा मोठी असल्यामुळे अनेक खेळाडू दर्जा असुनही मोठ्या पातळीवर खेळू शकत नाहीत. तसे पाहिले तर या 11 खेळाडूंव्यतिरिक्तही  त्यांच्या तोडीस तोड असे कितीतरी गुणवंत क्रिकेटपटू भारतात आहेत. पण वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येकजण स्वतःची क्रिकेट कारकीर्द मोठी बनवू शकत नाही. राज्यासाठी किंवा देशासाठी खेळू न शकणारे असे असंख्य क्रिकेटपटू लोकल क्रिकेट स्पर्धांमध्ये स्वतःची गुणवत्ता दाखवत असतात. व्हायरल व्हिडिओत दिसत असलेल्या या खेळाडूचे नावाची पुष्टी अध्याप झाली नाहीये. पण व्हिडिओ तरीही सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पर्यंत पोहोचला.

व्हिडिओ एका लोकल क्रिकेट स्पर्धेतील आहे. यात गोलंदाजाने टाकलेल्या वेगवान चेंडूवर फलंदाज जोरदार शॉट खेळतो. फलंदाजाने मारलेला चेंडू सीमारेषेपार चालला होता. फलंदाजी करणाऱ्या संघाला या चेंडूवर सहा धावा मिळणारच होत्या तितक्यात सीमारेषेजवळ उभा असलेल्या श्रेत्ररक्षकाने चपळाई दाखवली. सीमारेषेच्या अगदी जवळ उभा असलेल्या या खेळाडूने चेंडू झेलला, पण आपण सीमारेषेच्या बाहेर जाणार हे लक्षात आल्यानंतर त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला. हा खेळाडू सीमारेषेपार गेल्यानंतर त्याने अगदी एखाद्या प्रोफेशनल फुटबॉलपटूप्रमाणे चेंडू पायाने मारला आणि पुन्हा सीमारेषेच्या आतमध्ये पाठवला. चेंडू पुन्हा मैदानात आल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका खेळाडूने तो झेलला आणि फलंदाजाने विकेट गमावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक झेल घेतले गेले आहेत. पण अशा प्रकारचा झेल अद्याप कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायाला मिळाला नसेल. भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील हा झेल पाहून आश्चर्यचकीत झाल्याचे दिसते. सचिनने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “फुटबॉल खेळणाऱ्या एखाद्याला जेव्हा तुम्ही संघात घेता, तेव्हा असे होते.” कॅप्शनमध्ये सचिनने पुढे फुटबॉल, बॅट आणि स्माईली या तीन ईमोजी देखील शेअर केल्या आहेत. व्हिडिओवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. (Sachin Tendulkar has shared a stunning catch from the local cricket tournament on his social media)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

खेळपट्टीच्या वादावर रोहितचे परखड मत! ऑस्ट्रेलियाला म्हणाला, ‘तुम्ही स्किलवर…’
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---