दिग्गज भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सर्व वातावरण सचिनमय असताना सचिन ने स्वतः पुढे येउन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन सध्या देशभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ आजाराविषयी जनजागृती व प्लाझ्मा दान करण्याचा संदेश देताना दिसून आला.
सचिनने दिला खास संदेश
अनेक भारतीयांप्रमाणे सचिनलाही कोविड-१९ या आजाराने आपल्या विळख्यात घेतले होते. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळून आल्यानंतर सचिन कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्याने योग्य उपचार घेत या आजारावर मात केली. ८ एप्रिल रोजी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले व त्यानंतर तो घरी विलगीकरणात होता. आता या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर आपल्या वाढदिवशी त्याने एका सामाजिक संदेशासह व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये सचिन म्हणतो, “मी तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो. जो मला डॉक्टरांनी देण्यास सांगितला आहे. मी प्लाझ्मा दान केंद्राचे उद्घाटन केले होते. योग्यवेळी बाधित रुग्णाला प्लाझ्मा मिळाला तर, रुग्णाचा जीव वाचू शकतो. मी देखिल ज्यावेळी पूर्णपणे तंदुरुस्त होईल तेव्हा प्लाझ्मा दान करेल.”
Thank you everyone for your warm wishes. It's made my day special. I am very grateful indeed.
Take care and stay safe. pic.twitter.com/SwWYPNU73q
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 24, 2021
कोविडमधून बरी झालेली व्यक्ती १४ दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकते. सचिन पुढे म्हणाला, “लोकांना आम्ही प्रार्थना करू इच्छितो की रक्तदान करावे. त्यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होते. जेव्हा आपण आजारी असतो त्यावेळी आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार हे अनेक संकटांचा सामना करतात.”
कोविड सोबतचा आपला लढा सांगितल्यानंतर, सचिनने या व्हिडिओच्या अखेरीस आपल्या वाढदिवशी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनची खोड काढणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पडले होते महागात, चाहत्याने दिले होते असे उत्तर!
व्हिडिओ : मुंबईला धूळ चारल्याने गेल आनंदी, म्हणतोय ‘मोगॅम्बो खुश हुआ’
अजबच! ३०० पेक्षाही अधिक टी२० सामने खेळलेल्या आंद्रे रसलचा ‘या’ अनोख्या आंधश्रद्धेवर विश्वास






