---Advertisement---

तुझ्या वक्तव्याबद्दल सलाम! साहाने रिषभ पंतबद्दल सद्भावनेने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल अगदी पाकिस्तानमधून होतंय कौतुक

On: रविवार, मे 23, 2021 11:36 PM
---Advertisement---

गेल्या काही वर्षात भारतीय कसोटी संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. त्यातच माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबबादारी वृद्धिमान साहाने समर्थपणे सांभाळली व सध्या त्याला या जागेसाठी आता रिषभ पंतचे आव्हान मिळत आहे. पंतनेही यष्टीरक्षणात हळूहळू सुधारणा करत संघातील जागा पक्की केली आहे. असे असतानाही साहाने काहीदिवसांपूर्वी पंतबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल त्याचे पाकिस्तानमधूनही कौतुक होत आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सलमान बट याने एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान रिषभ पंतची बाजू घेतल्याबद्दल वृद्धिमान साहाचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला होता की इंग्लंड दौऱ्यासाठी रिषभ पंतच संघाचा यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती असेल. साहाच्या या इतर खेळाडूंबद्दल असलेल्या सद्भावनेबद्दल सलमान बट्टने त्याचे कौतुक केले आहे. आपल्या युट्यूब चॅनेल वरील कार्यक्रमादरम्यान बट्टने साहाच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करत त्याच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत.

बट्ट म्हणाला की, ‘साहाला त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल सलाम. मी त्याला आगोदरपासून ओळखतो. आम्ही दोघेही आयपीएलच्या पहिल्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेलो आहोत. तो एक अत्यंत नम्र खेळाडू आहे. ज्याप्रमाणे तो सहकारी यष्टिरक्षकाबद्दल बोलला यातून त्याचे विचार स्पष्ट होतात.’

बट्ट पुढे म्हणाला की, ‘मी हे भारतीय क्रिकेटसाठीचे एक चांगले चिन्ह मानतो. यावरून असे दिसून येते की गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटने अवलंबिलेले धोरण व व्यवस्था यशस्वी झाली आहे.आता खेळाडूंना असुरक्षित वाटत नाही.’

साहाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पंतने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरी केलेली आहे. इंग्लंड दौर्‍यामध्ये पंत हा यष्टीरक्षक म्हणून पहिला पर्याय असावा. मी सुद्धा या दौर्‍यासाठी सज्ज आहे आणि मला संधी मिळाली तर मी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की रिषभच्या पदार्पणानंतरही यष्टीरक्षक म्हणून साहा नेहमीच भारतीय संघाची पहिली पसंत होता. मात्र साहाच्या दुखापतीमुळे रिषभने त्याची जागा घेतली व आपल्या शानदार कामगिरीमुळे आता त्याने संघात आपले स्थान पक्के केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बंदीसाठी बाबा अन् मी जबाबदार! पृथ्वी शॉने कारकिर्दीतील कठीण काळाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया

कट्टर फुटबॉलप्रेमी असलेल्या ‘या’ शहरात आता उभारले जाणार क्रिकेट स्टेडियम

अजबच! शोएब मलिकने चौकार तर आडवला, पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाज धावले ५ धावा, पाहा गमतीशीर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---