भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यासाठी सरते वर्ष संमिश्र ठरले. पहिले 7 महिने तो फलंदाजीत तितका यशस्वी ठरला नाही. मात्र, त्यानंतर आशिया चषकापासून वर्षाच्या अखेरीपर्यंत त्याची बॅट चांगलीच बॅट बोलली. विराटला पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेले पाहून भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक व समालोचक संजय बांगर यांनी एक मोठे विधान केले आहे.
विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, मागील जवळपास तीन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून कोणतेही आंतरराष्ट्रीय शतक आले नव्हते. अखेर ऑगस्टमध्ये झालेल्या आशिया चषकात त्याने शतकांचा हा दुष्काळ संपवला. टी20 प्रकारातील आपले पहिले शतक साजरे करत त्याने 1000 पेक्षा जास्त दिवसानंतर शतक झळकावले. यानंतर झालेल्या टी20 विश्वचषकात तो सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला. तर, वर्षाच्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यावरही वनडेत शतक करून त्याने आपल्या शतकांची संख्या 72 पर्यंत नेली.
त्याच्या याच फॉर्ममूळे संजय बांगर यांनी त्याचे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना बांगर म्हणाले,
“विराटला जो फॉर्म गवसला आहे त्याबद्दल मी आनंदी आहे. मी हे नक्कीच म्हणू शकतो की, विराट येत्या वर्षात आपल्या वनडे शतकांची संख्या 50 पर्यंत नक्की नेईल.”
बांगर हे विराट कर्णधार असताना भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी देखील ते हीच भूमिका पार पाडतात. विराटने आत्तापर्यंत आपल्या वनडे कारकीर्दीत 265 सामने खेळताना 57.47 च्या शानदार सरासरीने 12,471 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 44 शतकांचा समावेश होतो. त्याच्या नावे कसोटीत 27 व टी20 मध्ये एक शतक जमा आहे.
(Sanjay Bangar Hoping Virat Kohli Complete 50 ODI Century In 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याचा बीसीसीआयने केला अपमान तोच बनणार निवडकर्ता; ‘या’ नव्या नावांचीही चर्चा
व्यस्त वेळापत्रकामुळे किवी गोलंदाजाला आले टेंशन, भारत-पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून घेतली माघार