मुंबई। भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा 86 वा मोसम सुरु आहे. या मोसमातील 9 व्या फेरीत मुंबई संघाचा सामना मध्य प्रदेश संघाविरुद्ध होत आहे. या सामन्यात मुंबईकडून मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानने दीडशतकी खेळी केली आहे.
त्याने मुंबईकडून पहिल्या डावात 210 चेंडूत 24 चौकार आणि 3 षटकारांसह 177 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे मागील 4 सामन्यातील हे त्याचे तिसरे मोठे शतक आहे. मागील 4 सामन्यातील 5 डावात त्याने अनुक्रमे नाबाद 301, नाबाद 226, 78, 25 आणि 177 धावांच्या खेळी केल्या आहेत.
तो सध्या सुरु असलेल्या मध्यप्रदेश विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तो ज्यावेळी फलंदाजीला आला तेव्हा मुंबईची आवस्था 72 धावांवर 3 विकेट्स अशी होती.
यावेळी त्याने या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आकर्षित गोमेलबरोबर चौथ्या विकेटसाठी 275 धावांची भागीदारी रचत मुंबईचा डाव सावरला. आकर्षितनेही या डावात शतकी खेळी केली. आकर्षितने 240 चेंडूत 122 धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद 427 धावा केल्या.
विशेष म्हणजे सर्फराजने ही दीडशतकी खेळी करण्याआधी त्याला 4 धावांवर असताना जीवदान मिळाले होते. झाले असे की तो 4 धावांवर असताना बाद झाला होता. पण तो चेंडू नो बॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले.
१ वर्षांनंतर पुनरागमन करताच डेल स्टेनने केला मोठा विश्वविक्रम
वाचा????https://t.co/SKDMj4ZmjP????#म #मराठी #Cricket #SAvENG @DaleSteyn62— Maha Sports (@Maha_Sports) February 13, 2020






