---Advertisement---

या खेळाडूने केले अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक करत रचला मोठा विक्रम

On: मंगळवार, नोव्हेंबर 19, 2019 1:32 PM
---Advertisement---

रविवारी (17 नोव्हेंबर) मुंबई येथे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील (Sayed Mushtaq Ali Trophy)  मिझोरम (Mizoram) आणि मेघालय (Meghalaya) या संघात टी20 सामना पार पडला. या सामन्यात मेघालयच्या अष्टपैलू क्रिकेटपटू अभय नेगीने (Abhay Negi) सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा मोठा विक्रम मोडला आहे.

अभय नेगीने मिझोरमविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करत अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि रॉबिन उथप्पाचा (Robin Uthappa)ला मागे टाकत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी उथप्पाने 15 चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा हा पराक्रम केला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 मध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर आहे, त्याने 2007 टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले होते.

त्याचबरोबर, वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल (Chris Gayle), हजरतुल्ला जाझाई (Hazratullah Zazai) यांनीही टी20 प्रकारात 12 चेंडूंत अर्धशतके ठोकण्याचे पराक्रम केला आहे.

रविवारी मुंबईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मिझोरम विरुद्ध मेघालय सामन्यात मेघालयाचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 207 धावा केल्या होत्या.

मेघालयकडून फलंदाजी करताना प्रथम द्वारका रवी तेजाने (Ravi Teja) 31 चेंडूत 53 धावा केल्या आणि त्यानंतर अभय नेगीने नाबाद 50 धावा केल्या. रवी तेजाने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर, नेगीने 6 षटकारांसह 2 चौकार ठोकले. 

त्यानंतर मिझोरमचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्यांना 208 धावांचा पाठलाग करताना 20 षटकांत 2 बाद 182 धावाच करता आल्या. मिझोरमकडून तरूवर कोहलीने 59 चेंडूत 90 धावा आणि केबी पवनने (KB Pawan) 46 चेंडूत 72 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---