वनडे आणि कसोटीत असा पराक्रम करणारा सेहवाग जगातील एकमेव खेळाडू

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग हा जगातील एकमेव सलामीवीर फलंदाज आहे, ज्याने कसोटी आणि वनडेमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत.

सेहवागने (Virender Sehwag) कसोटी आणि वनडे या दोन्ही क्रिकेट प्रकारात ७५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये सेहवागच्या विक्रमाच्या जवळ जाणारा इतर कोणताही खेळाडू नाही.

काही फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये तर काही फलंदाजांनी वनडे क्रिकेटमध्ये ७५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. परंतु कसोटी (Test) आणि वनडे (ODI) क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकही फलंदाज नाही.

तसं पाहिलं तर सेहवागची गणना जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये केली जात होती. सेहवागने वनडे क्रिकेटमध्ये 8273 धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीला फलंदाजी (Opener Batsman) करताना सेहवागने ७५१८ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 8586 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सलामीला फलंदाजी करताना ८२०७ धावा केल्या आहेत.

सेहवागने आपल्या कारकीर्दीत १०४ कसोटी सामने आणि २५१ वनडे सामने खेळले आहेत. जरी सेहवागने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही त्याच्यासारखा दुसरा फलंदाज आजपर्यंत पहायला मिळाला नाही. तरीही भविष्यात सेहवागचा हा विक्रम कोण मोडतो हे पहावे लागेला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-एवढं चांगलं खेळणाऱ्या श्रेयस अय्यरची ही इच्छा कधी पुर्ण होणार

-आफ्रिदीने कामच असं केलं की भज्जीला कराव लागलं कौतूक

-जगातील पहिली क्रिकेट टीम, जी देणार आपला अर्धा पगार कोरोना बाधितांना

You might also like