---Advertisement---

२ चेंडूत २१ धावा करण्याचा खतरनाक विक्रम सेहवागच्या नावावर आहे जमा

On: सोमवार, एप्रिल 13, 2020 7:48 AM
---Advertisement---

आजवर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी अनेक अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत, ज्यांना मोडता येणे खूप कठीण काम आहे. अशा प्रकारेच २ चेंडूत २१ धावा करण्याचा खतरनाक विक्रमही क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम भारतीय संघाच्या विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे.

झाले असे की, २००४ साली भारत विरुद्ध पाकिस्तान संघात वनडे मालिका झाली होती. त्यावेळी सेहवागने (Virender Sehwag) फलंदाजी करत असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नावेद उल हसनच्या (Naved Ul Hasan) गोलंदाजीवर २ चेंडूत २१ धावा करण्याचा कारनामा केला होता.

नावेद त्याचे पहिले षटक आणि सामन्यातील ११वे षटक टाकण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने गोलंदाजी करताना पहिला नो बॉल टाकला आणि याच चेंडूवर सेहवागने चौकार ठोकला. त्यानंतर नावेदने दुसरा आणि तिसराही नो बॉलच टाकला आणि सेहवागनेही या दोन्ही चेंडूंवर दमदार चौकार मारला.

पुढे चौथा चेंडू मात्र नावेदने व्यवस्थित टाकला. ज्यावर सेहवागने एकही धाव घेतली नाही. अशा प्रकारे अवघ्या ४ चेंडूत सेहवागने १५ धावा आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. यानंतर गोलंदाजी करताना नावेदने परत नो बॉल टाकला आणि सेहवागने यावरही चौकार ठोकण्याचा कारनामा केला. एवढेच नाही तर, नावेदने पुढील चेंडूही नो बॉल (No Ball) टाकला. पण, यावर सेहवागला एकही धाव घेता आली नाही.

अशा प्रकारे, नावेदने ११ व्या षटकात ४+१, ४+१, ४+१, ०, ४+१, १ एकूण २१ धावा दिल्या. अर्थातच सेहवागने नावेदच्या अवघ्या २ चेंडूत २१ धावा (21 Runs in 2 Balls) करण्याचा कारनामा करत एक अनोखा विक्रम केला. असा विक्रम करणारा तो जगभरातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या हा अजूनही अबाधित आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-धोनी क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी कूल क्रिकेटर म्हणून ओळख असलेले ५ खेळाडू

-चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश

-रात्री दोन वाजता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसमोर कृणालने केले होते हे काम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---