काही दिवसांपूर्वी ‘८३’ हा क्रिकेटवर आधारित चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात १९८३ विश्वचषक स्पर्धेची गोष्ट दाखवण्यात आली होती. आता क्रिकेटवर आधारित आणखी एक मोठा चित्रपट ‘जर्सी’ (Jersey movie) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर अभिनय करताना दिसून येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटापूर्वी जर्सीची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येत आहे. शाहिद कपूरला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कुठल्या २ खेळाडूंना पाहून प्रेरणा मिळाली. याचा खुलासा त्याने दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
जर्सी या चित्रपटात शाहिद कपूर क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मी एमएस धोनी (ms dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या व्यक्तिमत्त्वाने थक्क झालो आहे. या दोन्ही खेळाडूंकडून मला प्रेरणा मिळाली आहे.” (Shahid Kapoor inspired by these 2 indian cricketers)
तसेच तो पुढे म्हणाला की, “एक फलंदाज म्हणून कुठल्या खेळाडूकडून प्रेरणा घेण्यात काही अर्थ नाही. कारण, तुम्ही कधीच एका प्रोफेशन खेळाडूसारखे खेळू शकणार नाही. परंतु काही लोकांची उपस्थिती आणि व्यक्तिमत्त्व असे काहीतरी आहे जे तुम्हाला आकर्षित करते. माझ्या मते धोनी आणि विराट कोहली हे असे दोन फलंदाज आहेत. जेव्हा ते मैदानात येतात त्यांच्यात काहीतरी वेगळं जाणवतं.”
एमएस धोनी आणि विराट कोहलीबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, “एमएस धोनी आणि विराट कोहली हे दोन असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांची फलंदाजी मी माझ्या चित्रपटात अर्जुन तलवारची भूमिका साकरण्यापूर्वी पाहिली होती. मी या दोघांशी केवळ क्रिकेटपटूच म्हणून नव्हे तर खेळाच्या आवडीमुळेही जोडलो गेलो आहे. मला असे वाटते की, जेव्हा हे दोघे मैदानावर असतात त्यावेळी त्यांना खेळताना पाहणे हे इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी असते.”
महत्वाच्या बातम्या :
अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट
तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव
हे नक्की पाहा :