ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यात बांगलादेश संघाला ३ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र या सामन्यात बांगलादेश संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नावे नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे गोलंदाजाला नेमकी कुठे गोलंदाजी करावी हे कळत नाही, ज्याचा फायदा फलंदाजाला होत असतो. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान घडला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाकडून डॅनियल क्रिश्चियनने शाकिब अल हसनच्या चेंडूवर एकाच षटकात तब्बल ५ षटकार लगावले आहेत. (Shakib al hasan makes unwanted record in T20 international cricket)
दुसऱ्या डावात चौथे षटक टाकण्यासाठी शाकिब अल हसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू क्रिश्चियनने सीमारेषबाहेर पाठवला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने सलग दोन षटकार लगावले. चौथ्या चेंडूवर त्याला षटकार मारता आला नाही. परंतु पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर क्रिश्चियनने पुन्हा सलग दोन षटकार लगावले. यादरम्यान त्याच्या नावावर एक नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
तो टी -२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात २ वेळेस ३० पेक्षा अधिक धावा खर्च करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी झिम्बाब्वे संघाचा खेळाडू रयान बर्लने देखील शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ३० धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी झिम्बाब्वे संघ फलंदाजी करत असताना १६ वे षटक टाकण्यासाठी शाकिब अल हसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील एकही चेंडू बर्लने वाया जाऊ दिला नव्हता. त्याने या षटकात ३ चौकार आणि ३ षटकार मारत तब्बल ३० धावा कुटल्या होत्या.
अखेर ऑस्ट्रेलिया संघाने मिळवला विजय
चौथ्या टी-२० सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून एस्टन एगर आणि डॅनियल क्रिश्चियनने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया संघावर ३ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह आता टी-२० मालिका ३-१ वर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एक षटक, ५ षटकार; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांने सर्वात अनुभवी बांगलादेशी गोलंदाजाची काढली पिसं
अखेर खाते उघडले! सलग चौथ्या पराभवातून थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलिया, ‘हा’ खेळाडू ठरला विघ्नहर्ता
संघ सहकाऱ्याचा डिविलियर्सवर गंभीर आरोप; म्हणाला, ‘तो माझा हिरो होता, पण त्याने माझ्यासोबतच…’