भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या विश्वचषक 2023 मध्ये कहर करणाऱ्या चेंडूंचे उत्तर आतापर्यंत कोणत्याही संघाला सापडलेले नाही. शमीने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या फलंदाजांना लक्ष्य केले आणि सात विकेट्स घेतल्या. शमीने स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात 9.5 षटकात 57 धावांत सात विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
यासह मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. विश्वचषकात सर्वाधिक वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. शमीने चौथ्यांदा विश्वचषकात एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत तीन वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचा विक्रम मोडला आहे.
एवढेच नाही तर विश्वचषक स्पर्धेत तीन वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा मोहम्मद शमी जगातील पहिला गोलंदाज ठरला. शमीसारखा पराक्रम दुसरा कोणी करू शकला नाही.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 397 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 48.5 षटकांत 327 धावांत सर्वबाद झाला.
मोहम्मद शमीने रचिन रवींद्र (13), डेव्हॉन कॉनवे (13), केन विलियमसन (69), टॉम लॅथम (0), डॅरिल मिचेल (134), टीम साऊथी (9) आणि लोकी फर्ग्युसन (6) यांना आपले बळी बनवले. यासह मोहम्मद शमी सध्याच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. शमीने 6 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत.
वनडे डावात सात विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला. याशिवाय शमीने विश्वचषकात 50 विकेट्सचा टप्पाही पार केला. विश्वचषकामध्ये सर्वाधिक 54 विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो सहाव्या स्थानावर आहे. (Shami big record in the World Cup Australia legendary bowler was given a rookie pass)
म्हत्वाच्या बातम्या
फायनलचं स्वप्न भंगताच विलियम्सन निराश, पण रोहितसेनेचं कौतुक करत म्हणाला, ‘भारत या विजयाचा हक्कदार…’
Semi Final 2: जागा एक, दावेदार 2! भारताशी फायनल खेळण्यासाठी कोलकात्यात भिडणार SA vs AUS, वाचा सविस्तर