---Advertisement---

पुणेकर फलंदाजाला ‘बोल्ड’ करत शमीने रचला खास विक्रम

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 4:56 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात शनिवारी झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने खास विक्रम केला. आयपीएलमध्ये त्याने ५० विकेट्स घेण्याचा भीमपराक्रम केला.

विशेष म्हणजे त्याची ५०वी विकेट ही महाराष्ट्राचा रणजीपटू राहुल त्रिपाठी होता. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने राहुलला त्रिफळाचीत केले. यामुळे गेल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या राहुलला केवळ ४ धावांवर समाधान मानत तंबूचा रस्ता धरावा लागला.

गमतीचा भाग म्हणजे यापुर्वी शमीने आयपीएलमधील ४०वी विकेट ही देखील महाराष्ट्राचा रणजीपटू केदार जाधवची घेतली होती. ८ एप्रिल २०१३ रोजी शमी आपला पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर गेल्या ७ वर्षात त्याने ५६ सामन्यात ३५.१६च्या सरासरीने ५० विकेट्स घेतल्या आहे. तसेच ८.९२च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. फलंदाजीत मात्र शमीने ५६ सामन्यांत बरोबर ५६ धावा केल्या आहेत.

शमीच्या आयपीएलमधील विकेट्स-
पहिली विकेट- थिसारा परेरा
दहावी विकेट- विराट कोहली
विसावी विकेट- कृणाल पंड्या
तिसावी विकेट- कृणाल पंड्या
चाळीसावी विकेट- केदार जाधव
पन्नासावी विकेट- राहुल त्रिपाठी

महत्त्वाच्या बातम्या-

”केवळ ‘या’ कारणामुळे आम्ही सामना गमावला” दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर स्मिथने दिली प्रतिक्रिया

रिषभ, अय्यर धावबाद झाले आणि दिल्लीने नोंदवला ‘हा’ नकोसा विक्रम

आयपीएलमध्ये संघर्ष करत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने ‘या’ ३ खेळाडूंना द्यायला हवी अंतिम ११ जणांमध्ये संधी

ट्रेंडिंग लेख-

IPL 2020: पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम

शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून

शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---