इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. चेन्नईने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर मुंबईला अद्याप हंगामातील एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी सुरुवातीचे सलग ५ सामने गमावले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन याने मुंबईने यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर १५.२५ कोटी खर्च करण्याच्या निर्णयाला मोठी चूक म्हटले आहे.
वॉटसनने (Shane Watson) इशानचे वर्णन “अत्यंत प्रतिभावान” असे केले आहे. परंतु युवा यष्टीरक्षक फलंदाजामुळे (Ishan Kishan) मुंबईला संघाच्या गुणवत्तेचा त्याग करावा लागला, असे त्याचे म्हणणे आहे.
मुंबईने (Mumbai Indians) या हंगामासाठी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केले होते. त्यानंतर मेगा लिलावात त्याला मोठी रक्कम खर्च करून विकत घेतले होते. परंतु या हंगामात मुंबई संघाचे प्रदर्शन अतिशय सुमार आहे. त्यांनी आतापर्यंतचे पाचही सामने गमावले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
द ग्रेड क्रिकेटरवर बोलताना वॉटसन म्हणाला की, “मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, याचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. कारण त्यांच्यासाठी मेगा लिलाव आश्चर्यकारक राहिला होता. इशानवर त्यांनी इतके पैसे (Ishan Kishan 15.25 Crore) खर्च करणे, हा त्यांचा निर्णय फसला (Mumbai Indians Playing Price For Ishan’s Decision) आहे. इशान नक्कीच एक प्रतिभाशाली आणि कुशल क्रिकेटपटू आहे. परंतु तुम्ही त्याच्यावर आपली पूर्ण रक्कम खर्च करण्याइतकाही तो पात्र नाहीय. तसेच जोफ्रा आर्चरच्या उपलब्धतेबद्दल माहिती असूनही तुम्ही त्याच्यावर दाव लावला. त्याने गेल्या बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळलेले नाही. त्यांच्या संघात खूप कमतरता आहेत.”
सीएसकेबद्दलही शेन वॉटसनने दिली प्रतिक्रिया
मुंबईव्यतिरिक्त ४ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विषयी बोलताना वॉटसनने त्यांच्यातील उणीव सांगितली आहे. तो म्हणाला की, “सीएसकेतही यावेळी काही उणीव दिसून आल्या आहेत. विशेषकरून त्यांची वेगवान गोलंदाजी. गतवर्षी त्यांच्याकडे शार्दुल ठाकूर होता. दीपक चाहरही सध्या दुखापतग्रस्त झाला आहे. सीएसकेने त्याच्यावर मेगा लिलावात मोठे पैसे खर्च केले होते. परंतु तो या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाहीय, जो खूप मोठा मुद्दा आहे. त्यांच्याकडे जोश हेजलवुडसारखा परदेशी गोलंदाजही नाहीये. त्यामुळेच हा संघ यंदा संघर्ष करतो आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय क्रिकेटरच्या मते ‘हा’ आहे आशियातील सर्वश्रेष्ठ खेळाडू, तर आझमला दिलीय दुसरी पसंती
जो रुटने तर नेतृत्व सोडले, आता कोण होणार इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार? ‘हे’ आहेत चार पर्याय
बटलरने भिरकावला गगनचुंबी षटकार, पण पुढच्याच चेंडूवर फर्ग्यूसनने असा काढला काटा; VIDEO VIRAL