भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर (shardul thakur) याने मागच्या काही काळात स्वतःला एका चांगल्या फलंदाजाच्या रूपात वेगळी ओळख दिली आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने संघासाठी महत्वाच्या धावा केल्या, ज्यामुळे शेवटच्या डावात भारतीय संघ सन्मानजनक धावसंखेपर्यंत पोहोचू शकला. अशातच दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर (imran tahir) याने शार्दुलविषयी एक मोठा खुलासा केला आहे.
शार्दुल ठाकुरने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात २४ चेंडूत २८ धावा केल्या, ज्या संघासाठी खूपच महत्वाच्या होत्या. परंतु, तरीही भारतीय संघाला या सामन्यात सात विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. शार्दुल आणि इम्रान ताहीर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतात आणि त्यांनी बराच काळ एका ड्रेसिंग रूममध्ये घालवला आहे. इंम्रान ताहीरने सांगितले आहे की, शार्दुल सीएसकेसाठी सराव करताना फलंदाजीवर विषेश लक्ष देत असायचा. तो गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीवर मेहनत घेत असायचा.
इम्रान एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, “शार्दुलला त्याच्या फलंदाजीवर खूप अभिमान आहे. तो स्वतःच्या फलंदाजीला खूप गंभीरतेने घेतो. मी त्याच्यासोबत चैन्नईमध्ये खेळतो आणि तो फलंदाजीचा खूप सराव करतो. एक-दोन वेळा नेट्समध्ये पुरेसी फलंदाजी करायला न मिळाल्यामुळे त्याला राग देखील आला होता. त्याने अनेक सामन्यांमध्ये खूप महत्वाच्या धावा केल्या आहेत. या खूप महत्वपूर्ण धावा आहेत. ज्याप्रकारे हा सामना पुढे जाईल तुम्ही त्या धावांची किंमत पाहाल आणि मला वाटते की, ज्या सकारात्मकतेने तो खेळला, तो त्याचा स्वाभाविक खेळ आहे. त्याचे बक्षिस देखील त्याला मिळाले आहे.”
भारतीय दिग्गजांनी केले शार्दुलच्या फलंदाजीचे कौतुक
भाराताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, शार्दुल ठाकुरने निवडकर्त्यांना त्याला निवडण्यासाठी एक मजबूत कारण दिले आहे. तसेच माजी दिग्गज गौतम गंभीरने देखील शार्दुलचे कौतुक केले. गंभीर म्हणाला की, “अप्रतिम योगदान आणि त्यामुळेच फक्त शार्दुल प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. जर तुम्ही आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत असाल, तर तुम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन केले पाहिजे. त्याने जे फटके खेळले, ते एका चांगल्या फलंदाजाप्रमाणे वाटत होते.”
महत्वाच्या बातम्या –
स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर १२ वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत अजिंक्य क्रिकेट क्लबचा रोमहर्षक विजय
भारताविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकन कर्णधारच म्हणतोय, ‘सामना जिंकण्याचा योग्य मार्ग कोणता…’
व्हिडिओ पाहा –