नुकताच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (icc under 19 world cup) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. या विजयात भारतीय संघाचा उपकर्णधार शेख राशिद (Sheikh Rasheed) याने देखील मोलाची भूमिका बजावली होती. त्याने उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत महत्वाची खेळी केली होती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर चहू बाजूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने त्याचे तोंडभरून कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू एमएसके प्रसाद (Msk Prasad) यांनी शेख राशिदचे कौतुक करत म्हटले की, ” तो कसोटी क्रिकेटमध्ये आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भविष्यातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होऊ शकतो.”
तसेच राशिद खानने विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्ही नुकताच १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आहे. ज्याचा सर्वांना आनंद झाला आहे. आम्ही सर्व इथे एका कुटुंबासारखे राहिलो आहोत. माझे भविष्य मी त्याच दिशेने घेऊन जाईल, जिथे ते जात असेल. मला माझ्या खेळात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि तर ते मी करेल.”
शेख राशिदच्या फलंदाजीबाबत बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले की, “तो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि उशिराने शॉट खेळतो. ज्यामुळे चेंडू खेळण्यासाठी त्याला अतिरिक्त वेळ मिळत असतो. हे खूप चांगले गुण आहेत. सर्वात प्रभावी होता तो म्हणजे त्याचा स्वभाव. भारतीय संघावर दबाव असताना तो कधीच निराश दिसून आला नाही.”
शेख राशिदने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक चांगली कामगिरी केली. तरीदेखील त्याने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली नाहीये. यामागचे कारण असे की, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाहीये. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “मला अनेक संधी मिळतील. मी या वर्षी खेळलो नाही तर याचा अर्थ जगाचा अंत झाला असे नाही. मी नंतर पात्र होईन.”
महत्वाच्या बातम्या :
शानदार सलामी देऊनही आता पूर्ण मालिकेत ईशान बसणार बाकावर! जाणून घ्या कारण
शेवटी क्रिकेटप्रेम! भारतीय संघ विश्वचषक जिंकावा म्हणून लता मंगेशकरांनी ठेवला होता निर्जळी उपवास
फ्लॉप कामगिरी करणाऱ्या युझवेंद्र चहलची गाडी ‘या’ दोन दिग्गजांमुळे आली ट्रॅकवर, स्वतः केला खुलासा