भारतीय संघाचा रिषभ पंत याचा शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) भीषण अपघात झाला. हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथे पंतची कार सकाळी 5.30वाजता दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. यादरम्यान तो सुदैवाने वाचला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली. असे असले, तरी 25 वर्षीय पंतने 3 वर्षांपूर्वी संघसहकाऱ्याचा सल्ला ऐकला असता, तर त्याला आज हा दिवस पाहावा लागला नसता. त्याच तोच व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. नेटकरी म्हणत आहेत की, त्याने मोठ्यांचा सल्ला हलक्यात घ्यायला नव्हता पाहिजे.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला 3 वर्षांपूर्वी त्याचा वरिष्ठ संघसहकारी शिखर धवन (Shikhar Dhawan) याने ‘गाडी हळू चालवत जा,’ असा सल्ला दिला होता. त्याने हा सल्ला ऐकला असता, तर तो कदाचित आज रुग्णालयात दाखल झाला नसता.
व्हायरल होत असलेला 11 सेकंदाचा हा व्हिडिओ इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेदरम्यानचा आहे. रिषभ पंत आणि शिखर धवन दोघेही दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळतात. दिल्लीच्या जर्सीत दिसणारे हे दोघेही कोणतातरी खेळ खेळताना दिसत आहेत. यामध्ये पंत कॅमेऱ्यासमोर धवनला म्हणतो की, “एक सल्ला, जो तुला मला द्यावासा वाटतोय.” यावर धवनने म्हटले होते की, “गाडी आरामात चालवत जा.” यानंतर ते दोघेही जोरजोरात हसू लागतात. पुढे पंत म्हणतो की, “ठीक आहे मी तुझा सल्ला ऐकतो आणि आता गाडी हळू चालवत जाईल.”
.@SDhawan25 ने एक वीडियो में ऋषभ पंत को सलाह देते हुए कहा था कि गाड़ी आराम से चलाया कर…
Prayers for your speedy recovery 🙏 #RishabhPant #Rishabpant #Pant @BCCI pic.twitter.com/Le4Jw7WSTx— Shiv Chaudhary (@shivchaudhary0) December 30, 2022
हरिद्वारचे एसएसपी अजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रुडकी येथे प्रथमोपचारानंतर रिषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.” आता देशभरात पंतच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्वीट करत लिहिले की, “रिषभ पंतसाठी प्रार्थना. बरं झालं की, तो धोक्यातून बाहेर आला आहे. पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना.”
पंतची दुखापत
माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतवर उपचार करणारे डॉक्टर सुशील नागर यांनी सांगितले की, पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. कारमध्ये आग लागूनही तो कुठूनही भाजला नाहीये. त्याला कपाळावर, डाव्या डोळ्याच्या वर, गुडघ्यावर आणि पाठीला दुखापत झाली आहे.
पंतची कारकीर्द
रिषभ पंत याने भारतीय संघाकडून 33 कसोटी सामने, 30 वनडे सामने आणि 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 43.67च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 34.6च्या सरासरीने 865 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 22.43च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकूण 6 शतकेही झळकावली आहेत. तसेच, त्याच्या नावावर 19 अर्धशतकांचाही समावेश आहे. (shikhar dhawan had gave driving advice to rishabh pant before 3 years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?