पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२८ मार्च) तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बेन स्टोक्सचा झेल हार्दिक पंड्याने सोडला होता. मात्र नंतर शिखर धवनने त्याचा झेल घेतल्यानंतर हार्दिकने हात जोडल्याचे पाहायला मिळाले.
नक्की काय झाले?
इंग्लंडकडून सलामीला जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो उतरले होते. मात्र, रॉय पहिल्याच षटकात बाद झाला. त्यामुळे स्टोक्सला लवकर फलंदाजीसाठी यावे लागले. मात्र, ५ व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर स्टोक्सने मोठा फटका मारला, या फटक्याने चेंडू लाँग ऑनला गेला. तिथे उभ्या असलेल्या हार्दिकच्या हातून हा चेंडू निसटला. त्यामुळे स्टोक्स १५ धावांवर बाद होता होता वाचला.
https://twitter.com/j_dhillon7/status/1376155566045757440
हार्दिकने जेव्हा स्टोक्सला झेल सोडला, तेव्हा मैदानात असलेले भारतीय खेळाडूंबरोबरच भारतीय ड्रेसिंगरुममध्ये बसलेल्या सदस्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कारण स्टोक्स हा एक आक्रमक फलंदाज आहे. तसेच त्याने मागील सामन्यातच ९९ धावांची खेळी केली होती.
त्यामुळे आता जीवदान मिळाल्यानंतर स्टोक्स भारताला भारी पडणार असे वाटत होते. पण अखेर ११ व्या षटकात टी नटराजनच्या गोलंदाजीवर स्टोक्स ३५ धावा करुन बाद झाला. त्याचा झेल शिखर धवनने घेतला. शिखर धवनने स्टोक्सचा झेल घेताच हार्दिकने सुटकेचा निश्वास सोडत हात जोडले. त्याची ही कृती पाहून अनेकांना हसू अवरले नाही.
https://www.instagram.com/p/CM9taB4AzW5/
https://twitter.com/ItsRobin_here/status/1376164549993275392
भारताचे इंग्लंला ३३० धावांचे आव्हान
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. भारताने याचा फायदा घेत ४८.२ षटकात सर्वबाद ३२९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून शिखर धवन(६७), रिषभ पंत(७८) आणि हार्दिक पंड्याने(६४) अर्धशतके केली.
महत्त्वाच्या बातम्या –
जोस बटलरच्या अप्रतिम एकहाती झेलाने रोखले रिषभ पंतचे वादळ, पाहा व्हिडिओ
हे भारीय! रिषभ पंत आऊट होऊ नये म्हणून इंग्लंडचाच माजी खेळाडू करत होता प्रार्थना
संचारबंदीच्या काळात मुंबईत होणार आयपीएलचे सामने? पाहा काय आहे सरकारचा निर्णय