पुणे | हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शनच्या सहयोगाने आयोजित हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत किरण नवगिरे( नाबाद 75धावा व 1-20) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शिवनेरी पँथर्स संघाने तोरणा टायगर्स संघाचा 9 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात शिवनेरी पँथर्स संघाने तोरणा टायगर्स संघाचा 9 गडी राखून सनसनाटी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना तोरणा टायगर्स संघाने 20षटकात 7बाद 150धावा केल्या. यात नेहा बडवाईकने 48धावा, चार्मी गवईने 37धावा, रोहिणी मानेने 11धावा व वैष्णवी शिंदेने 10धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. शिवनेरी पँथर्सकडून प्रियांका कुंभार 2-32, किरण नवगिरे 1-20, सायली लोणकर 1-24)यांनी सुरेख गोलंदाजी केली. शिवनेरी पँथर्स संघाने हे आव्हान 14.4षटकात 1गड्याच्या बदल्यात 151धावा करून पूर्ण केले. यामध्ये किरण नवगिरेने 41चेंडूत 10चौकार,1षट् काराच्या मदतीने नाबाद 75धावा व सायली लोणकरने 45चेंडूत 6चौकारांच्या मदतीने नाबाद 51धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी किरण नवगिरे ठरली.
याआधी स्पर्धेचे उद्धघाटन माजी रणजी खेळाडू विराग आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष हेमंत पाटील, नितीन सामल आणि जयंत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: तोरणा टायगर्स: 20षटकात 7बाद 150धावा(नेहा बडवाईक 48(43,7×4), चार्मी गवई 37(37,3×4),रोहिणी माने 11(13), वैष्णवी शिंदे 10(13,1×4), प्रियांका कुंभार 2-32, किरण नवगिरे 1-20, सायली लोणकर 1-24)वि.वि.शिवनेरी पँथर्स: 14.4षटकात 1बाद 151धावा(किरण नवगिरे नाबाद 75(41,10×4,1×6), सायली लोणकर नाबाद 51(45,6×4), ख़ुशी मुल्ला 1-20); सामनावीर-किरण नवगिरे; शिवनेरी पँथर्स 9 गडी राखून विजयी.