पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा बायोपिक येणार आहे. त्याचे नाव ‘रावळपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेन्स्ट द ऑड्स’ असे असेल. शोएबने स्वत: त्याच्या यूट्यूब चॅनलवर चित्रपटाशी संबंधित एक मोशन पोस्टर रिलीज केले. यामध्ये चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
चित्रपटाच्या रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एक माणूस रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसत आहे. शोएबचा जन्म रावळपिंडीत झाला आणि वेगवान गोलंदाज असल्याने त्याला रावळपिंडी एक्सप्रेस हे नाव मिळाले. त्याचा बायोपिकही याच नावाने येत आहे.
शोएब अख्तरच्या बायोपिकचे दिग्दर्शन मोहम्मद फजर कासीर करत आहेत. शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बायोपिकचे मोशन पोस्टर रिलीज केले आणि कॅप्शन लिहिले, “या सुंदर प्रवासाची सुरुवात. माझी कथा, माझे आयुष्य, माझा बायोपिक ‘रावळपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेन्स्ट द ऑड्स’ येणार आहे. तुम्ही यापूर्वी कधीही न केलेल्या राईडसाठी सज्ज व्हा. पाकिस्तानी खेळाडूवरचा पहिला विदेशी चित्रपट. तुमचा स्वतःचा शोएब अख्तर.”
https://twitter.com/shoaib100mph/status/1551259542205435904?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1551259542205435904%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-shoaib-akhtar-shared-motion-poster-of-his-biopic-rawalpindi-express-know-its-release-date-watch-video-4417249.html
शोएब बायोपिकचे मोशन पोस्टर आऊट
यूट्यूबवर शेअर केल्यापासून हा व्हिडिओ एका दिवसात ३० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. बायोपिकमध्ये शोएब अख्तरची भूमिका कोण करत आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्याच्यावर बायोपिक बनल्यास सलमान खानने त्याची भूमिका साकारावी, अशी इच्छा शोएबने फार पूर्वीच व्यक्त केली होती.
शोएबने पाकिस्तानकडून ४०० हून अधिक विकेट घेतल्या
शोएबने पाकिस्तानसाठी ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये ४०० हून अधिक बळी घेतले आहेत. मात्र, तो विकेटपेक्षा जास्त वेगासाठी ओळखला गेला. १०० मैलांपेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकणारा तो पहिला वेगवान गोलंदाज होता. त्याने २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
‘धोनी’सोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या विकेटकिपरची क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती