---Advertisement---

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्रेयस अय्यरचा सन्मान, ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी दिले पदक

On: बुधवार, मार्च 5, 2025 3:31 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघावरती मात करत अंतिम टप्प्यात स्थान मिळविले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांव्यतिरिक्त, क्षेत्ररक्षकांनीही क्षेत्ररक्षणाचे शानदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाकडून एलेक्स कॅरी चांगली फलंदाजी करत होता, परंतू श्रेयस अय्यरच्या जोरदार फटक्याने विकेटकीपर फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये फिल्डर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. श्रेयस अय्यरला फील्डर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. श्रेयस अय्यरला रवी शास्त्री यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. यावेळी, भारतीय संघातील जवळजवळ सर्व खेळाडूंव्यतिरिक्त, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. याचबरोबर श्रेयस अय्यर व्यतिरिक्त रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांना या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते, परंतु श्रेयस अय्यरला फील्डर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकांत 264 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे भारतासमोर सामन्यात 265 धावांचे लक्ष्य होते. भारताने 48.1 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 84 धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने 45 धावांचे योगदान दिले. तर केएल राहुलने 42 धावा केल्या आणि नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नाथन एलिस आणि एडम जम्पा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. बेन डौरिस आणि कूपर कॉनोली यांनी 1-1 बळी घेतले.

 

महत्वाच्या बातम्या : 

आयसीसी क्रमवारीत विराटची मोठी झेप, शुबमन गिल अव्वल स्थानी कायम, पण हिटमॅनला फटका

उपांत्य फेरीतील पराभवाचा धक्का की दुसरे कारण? स्मिथच्या अचानक निवृत्तीमागचे गूढ समोर

रोहित शर्माच्या कामगिरीवर गौतम गंभीरची स्पष्ट भूमिका! म्हणाला, ‘आकडेवारीपेक्षा विजय महत्त्वाचा….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---