---Advertisement---

पराभवानंतरही श्रेयस अय्यरने जिंकली मने; धोनी, कोहली, रोहितबद्दल केले मोठे भाष्य

On: शनिवार, मे 11, 2019 7:34 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आयपीएल 2019 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडलेल्या क्वाॅलिफायर 2 च्या सामन्यात दिल्लीला 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे दिल्लीचे आयपीएल 2019 मधील आव्हानही संपूष्टात आले.

पण या पराभवानंतर बोलताना दिल्ली संघाचा युवा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, त्याला त्याच्या संघाचा अभिमान आहे. दिल्ली संघासाठी हा मोसम शानदार ठरला. तसेच तो म्हणाला कर्णधार म्हणून नाणेफेकीवेळी एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बाजूला उभे राहुन खूप काही शिकायला मिळाले.

याबद्दल 24 वर्षीय अय्यर म्हणाला, ‘एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे जसे त्यांच्या संघाचे नेतृत्व करतात हे पाहून आणि नाणेफेकीवेळी त्यांच्याबरोबर उभे राहुन खूप शिकायला मिळते. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. तसेच मी माझ्या संघसहकाऱ्यांकडूनही खूप शिकलो. ते कठिण काळात माझ्याशी बोलायला आले.’

‘मी रोहित शर्मा आणि अन्य लोकांकडून ऐकले होते की नेतृत्व करणे सोपे नाही. हो, हे खरे आहे. नेतृत्व करणे सोपे नाही, पण मी कर्णधार म्हणून खूश आहे.’

‘मला माझ्या संघाचा अभिमान आहे. मागील मोसम आमच्यासाठी निराशाजनक होता. पण यावर्षी प्रत्येकाने जबाबदारीने कामगिरी केली. संघव्यवस्थापनाकडून चांगला पाठिंबा मिळाला. आम्ही एका परिवारासारखे एकत्र आलो. आमच्यासाठी हा स्वप्नवत मोसम होता. ही फक्त सुरुवात आहे. पाया रचला आहे आता पुढे जाण्याची वेळ आहे.’

दिल्लीने या मोसमात साखळी फेरीत 14 पैकी 8 सामने जिंकून गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला होता आणि 6 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

तसेच प्लेऑफमध्ये एलिमिनेटरच्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैद्राबादचा पराभव करत क्वाॅलिफायर 2 मध्ये स्थान मिळवले होते. पण क्वाॅलिफायर 2 मध्ये त्यांना चेन्नई विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आणि त्यामुळे त्यांचे आयपीएल 2019 मधील आव्हानही संपुष्टात आले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: मजेदार! एकाच दिशेला पळाले वॉटसन-डुप्लेसिस, दिल्लीने गमावल्या रनआऊटच्या संधी

इशांत शर्माने तब्बल १० वर्षांनंतर मारला टी२०मध्ये षटकार, पहा व्हिडिओ

आत्तापर्यंत या संघांनी खेळले आहेत आयपीएलचे अंतिम सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment