भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. मात्र, शानदार खेळ करूनही संघ विजेतेपदापासून एक पाऊल दूरच राहिला आणि अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीय खेळाडूंची, त्यांच्या कुटुंबियांची आणि करोडो चाहत्यांची मनं तुटली. अंतिम पराभवाच्या दु:खातून अद्याप कोणीही पूर्णपणे सावरलेले नाही. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने भारतीय संघ आणि तिचा भाऊ श्रेयसच्या अप्रतिम प्रवासाचे कौतुक केले आहे.
श्रेष्ठा अय्यर (Shrestha Iyer) हीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “प्रिय भारतीय संघ, ऑस्ट्रेलियाने चषक जिंकला आहे पण तुम्ही सर्वांची मनं जिंकली आहेत. सर्व 10 सामने जिंकून तुम्ही या स्पर्धेत ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले. तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हार मानली नाही आणि बरोबरीने लढा दिला ज्यामुळे तुम्ही सर्व विजेते आहात. मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे. होय, मी दु:खी आहे कारण आम्ही अंतिम फेरीत हरलो, पण तितकेच प्रयत्न केल्याबद्दल मी संघातील प्रत्येकाचा आदर करते. आपण पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परत येऊ.”
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बद्दल श्रेष्ठ म्हणाली, “श्रेयस आज तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू किती मेहनत केली आहे, हे कोणालाच माहीत नाही. मला तुझा अभिमान आहे एवढेच सांगायचे आहे. तुम्ही माझ्यासाठी आणि इतर अनेकांसाठी नेहमीच प्रेरणादायी प्रकाशमान असाल. कालचा दिवस आपल्यासाठी चांगला नव्हता पण मला विश्वास आहे की आपण पुन्हा मजबूत होऊ.”
श्रेयस अय्यरने विश्वचषकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने आपल्या बॅटने दोन शतके झळकावली. मात्र, अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला. (Shreyas Iyer sister disappointed after India defeat About the team and the brother she said You all till the end)
म्हत्वाच्या बातम्या
IPLमध्ये षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या धोनीच्या हुकमी एक्क्याची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार का कमाल?
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल