---Advertisement---

‘हा’ खेळाडू पुढील दहा वर्षे भारतीय संघाकडून खेळेल, मायकेल हसी यांनी वर्तविले भाकीत

On: गुरूवार, डिसेंबर 31, 2020 9:02 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून शानदार विजय मिळविला. तसेच ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघाकडून युवा फलंदाज शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी आपले कसोटी पदार्पण केले. या दोघांनीही पदार्पणातच लक्ष वेधून घेतले.

शुबमन गिलने या सामन्यात पहिल्या डावात ४५ तर दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्याच्या फलंदाजीचे कौतुक अनेक दिग्गजांनी केले. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसीनेही नुकतेच शुबमन गिल भारतासाठी पुढील १० वर्षे खेळताना दिसेल, असे भाकीत वर्तविले आहे.

भारताचे शानदार पुनरागमन

मायकेल हसी यांनी भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील धक्कादायक पराभवातून सावरत केलेल्या शानदार पुनरागमनाची स्तुती केली. अशा प्रकारे पुनरागमन करणे, कोणत्याही संघासाठी कठीण असते. मात्र ते भारतीय संघाने सध्या करून दाखवले, अशा शब्दात त्यांनी भारतीय संघाची पाठ थोपटली. तसेच युवा सलामीवीर शुबमन गिल याचेही त्यांनी कौतुक केले. “तो अतिशय काल्त्मक फलंदाज आहे आणि भारतीय संघासाठी पुढील १० वर्षे तो खेळताना दिसेल”, असे हसी यावेळी म्हणाले.

मायकेल हसी यांनी भारतीय संघाचा मेलबर्न कसोटीतील दुसरा पदार्पणवीर मोहम्मद सिराज याचेही कौतुक केले. हसी म्हणाले, “मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी कमजोर होईल असा माझा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही. सिराजने भारतीय संघाला शमीची कमतरता भासू दिली नाही. त्याने अपरातिं गोलंदाजीचा नजराणा पेश केला.”

भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळविल्याने ही मालिका आता रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील अजून दोन सामने शिल्लक आहेत. यातील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर ७ जानेवारीपासून खेळविण्यात येणार असून चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे.

संबधित बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– ऑस्ट्रेलियन फलंदाजीत ही सर्वात मोठी उणीव, सचिन तेंडुलकर यांनी केले स्पष्ट
– ४ जानेवारीपर्यंत मेलबर्नमधेच सराव करणार भारतीय संघ, हे आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---