सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे खेळाडूंसह सर्वांनाच घरात रहावे लागत आहे. या दरम्यान अनेक आजी-माजी खेळाडूंनी वेगवेगळे उपक्रम केले आहेत. अनेक खेळाडू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहे. तर अनेक खेळाडूंनी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.
असेच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक संजय मांजरेकर यांनीही त्यांच्या पत्नीसह एक गाणे रेकॉर्ड केले आहे. त्यांनी याबद्दल ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी आणि त्यांची पत्नी माधवी मांजरेकर यांनी गायलेल्या गाण्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्याला ‘माझा आणि माझ्या पत्नीचा हा प्रमाणिक प्रयत्न’ असे कॅप्शन दिले आहे.
A humble effort from me and my wife. A Marathi classic. pic.twitter.com/AGTd3csx71
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 5, 2020
संजय आणि माधवी मांजरेकर या पती-पत्नीने ‘शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी’ हे गाणे गायले आहे. त्या गाण्याच्या यूट्यूब व्हिडिओची लिंकही मांजरेकरांनी शेअर केली आहे.
Link to the full video: https://t.co/Il3rdm5jVL
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 5, 2020
‘शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी’ या मुळ गाण्याचे शब्द कवी मंगेश पाडगांवकर यांचे आहेत.
ट्रेंडिग घडामोडी –
…म्हणून इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूचे ट्विटर अकाउंट केले ब्लॉक; कारण घ्या जाणून
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पतीच्या जागेवर पत्नीने केले यष्टीरक्षण
महेश बाबूची पत्नी आणि मिस इंडिया नम्रता शिरोडकरचा हा आहे आवडता क्रिकेटर