भारतीय संघ मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 7 फलंदाजांसोबत उतरला होता. हा सामना जिंकत कर्णधार हार्दिक पंड्या याने स्पष्ट केले की, भारतीय संघ 7 फलंदाजांसोबत खेळणे सुरू ठेवेल. कारण, त्याला गोलंदाजीबाबत कोणतीही तडजोड करायची नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाच्या खालच्या फळीतील फलंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, जे बॅटमधून योगदान देऊ शकत नव्हते. अशात तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत पंड्याने सांगितले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाजीचे 7 पर्याय पुरेसे आहेत.
काय म्हणाला पंड्या?
सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “एका संघाच्या रूपात आम्ही 7 फलंदाजांसोबत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, जसे आज घडले. जर फलंदाज धावा करत असतील, तर तुम्हाला आठव्या क्रमांकावर कुणाचीही गरज नाहीये.” यावेळी पंड्याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचेही कौतुक केले. सूर्याने सामन्यात 44 चेंडूत 83 धावा चोपल्या. यामध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.
पंड्याचे सूर्याविषयी भाष्य
सूर्याविषयी बोलताना पंड्या म्हणाला की, “ज्याप्रकारे सूर्यकुमारने सांगितले की, ते (सूर्या आणि तिलक वर्मा) एकसोबत खेळतात आणि एकत्र वेळ घालवतात. संघात सूर्यासारखा फलंदाज असणे चांगले आहे. जेव्हा तो जबाबदारी घेतो, तेव्हा यामुळे दुसऱ्यांनाही एकप्रकारे संदेश मिळतो.”
आपली पहिलीच मालिका खेळत असलेला तिलक वर्मा (Tilak Varma) या सामन्यात 37 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे भारतीय संघाने 13 चेंडू शिल्लक ठेवत 164 धावा केल्या आणि सामना 7 विकेट्सने खिशात घातला.
भारताचे पुनरागमन
सूर्यकुमारच्या 83 धावांच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना 7 विकेट्सने जिंकला. यासोबतच मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. सूर्याने यावेळी 44 चेंडूच्या खेळीत 4 षटकार आणि 10 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त तिलकसोबत तिसऱ्या विकेटसाठी 51 चेंडूंत 87 धावांची आक्रमक भागीदारी रचत संघाचे सामन्यात पुनरागमन करून दिले. तिलक यावेळी अर्धशतकाला मुकला. त्याने 37 चेंडूत नाबाद खेळीत 1 षटकार आणि 4 चौकारांची बरसात केली. (Skipper hardik pandya statement team india suryakumar yadav t20 series comeback)
महत्त्वाच्या बातम्या-
जिथे विराट-रोहितला वर्षोनुवर्षे लागली, तिथे ‘या’ पठ्ठ्याने कमी काळात घडवला इतिहास; पाहा कौतुकास्पद कामगिरी
अखेर ‘सूर्यो’दय झालाच! 4 षटकार मारताच केला जबरदस्त Record, फक्त 2 भारतीयांना जमली होती कामगिरी