---Advertisement---

विजयानंतर मॅक्सवेलविषयी कर्णधार कमिन्सची मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला तर वाटलं होतं…’

Pat-Cummins-And-Glenn-Maxwell
---Advertisement---

अफगाणिस्तान संघ मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) पुन्हा एकदा विश्वचषक 2023 स्पर्धेत मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत होता. मात्र, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने हा अफगाणी डाव हाणून पाडला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना पायाला वेदना होऊनही चक्क द्विशतक ठोकले. त्याच्या या झंझावातामुळे ऑस्ट्रेलिया संघ वानखेडे स्टेडिअमवर 3 सविकेट्सने विजय मिळवण्यात यशस्वी झाला. तसेच, संघाने उपांत्य फेरीतही प्रवेश केला. या सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स याने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी मॅक्सवेलचेही कौतुक केले.

मॅक्सवेलचा झंझावात
वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात वादळ ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) नावाचे वादळ आले होते. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 128 चेंडूत तब्बल 201 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. ही खेळी पाहताच, प्रत्येक चाहता आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी आयुष्यात पाहिलेली सर्वोत्तम खेळी असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला 7 बाद 97 धावांवरून 292 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून दिला.

मॅक्सवेलला मिळाले जीवनदान
ग्लेन मॅक्सवेल याला सामन्यादरम्यान अनेकदा जीवनदान मिळाले. तो जेव्हा 27 धावांवर खेळत होता, तेव्हा त्याचा एलबीडब्ल्यूचा निर्णय बदलला गेला. त्यानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू मुजीब उर रहमानने त्याचा झेल सोडला. त्यावेळी मॅक्सवेल 33 धावांवर खेळत होता. इथून मॅक्सवेलने टिच्चून फलंदाजी केली आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला.

कर्णधार पॅट कमिन्स याने ग्लेन मॅक्सवेलसोबत आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची विक्रमी भागीदारी केली. कमिन्सने या सामन्यात तब्बल 68 चेंडूचा सामना करताना 1 चौकारासह फक्त 12 धावा केल्या. मात्र, या खेळीचे महत्त्व प्रचंड मोठे होते. तो दुसऱ्या बाजूने मॅक्सवेलच्या वादळी खेळीचा आनंद लुटत राहिला.

वेदनेने विव्हळला मॅक्सवेल
ग्लेन मॅक्सवेल याला मुंबईच्या उकाड्याचा त्रास होताना दिसला. त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. मॅक्सवेलवर अनेकदा ब्रेक घेण्याची वेळ आली. कारण, त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. मात्र, मॅक्सवेलने वेदना होऊनही हार मानली नाही आणि वनडे क्रिकेटमधील अविस्मरणीय खेळींपैकी एक खेळी आपल्या नावावर केली. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाला विजय मिळवूनच मैदानाबाहेर गेला.

कमिन्स काय म्हणाला?
सामन्यातनंतर कमिन्सने मॅक्सवेलविषयी प्रतिक्रिया दिली (Pat Cummins Statement). तो म्हणाला, “मला वाटले होते की, तो मैदानाबाहेर जाईल. हो, आमच्याकडे न्यू साऊथ वेल्सचे दोन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी बाकी होते. तेदेखील आपल्या संधीची वाट पाहत होते. पण होय, माझ्या मते झम्पा तीन वेळा येऊन परतला. मॅक्सवेलला त्याची खेळी सुरूच ठेवायची होती. मॅक्सवेलचा डाव वाढवता येत नाही. ही अमूल्य होती. विजय शानदार राहिला. ही क्रिकेटसाठी शानदार गोष्ट घडली. ही त्या दिवसांपैकी एक आहे, जेव्हा लोक म्हणतील, होय आम्ही या सामन्यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित होतो.”

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र
या विजयासह ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र (Australia qualify for Semi Finals) ठरला. ऑस्ट्रेलियाचे आता 12 गुण झाले आहेत. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरला. ऑस्ट्रेलियाचा आता 11 ऑक्टोबर रोजी अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (Skipper pat cummins reveals how glenn maxwell played greatest odi knock despite suffering from cramps australia vs afghanistan CWC 2023)

हेही वाचा-
हा विजय मॅक्सवेलचा! डबल सेंच्युरी ठोकत पठ्ठ्यानं अफगाणिस्तानची उडवली धूळधाण
ठरलं! उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार ऑस्ट्रेलिया, भारताविरुद्ध खेळण्यासाठी कुणाचा लागणार नंबर?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---