नेदर्लंडचा खेळाडू रोएल्ड वॅन डर मर्व सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी (20 ऑक्टोबर) ‘ग्रुप ए’ मधील सामन्यात संघासाठी मोठे धाडस दाखवले. त्याने मैदानात केलेल्या एका कृतीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. रोएल्पला या सामन्यात दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला नीट चालता देखील येत नव्हते. पण अशा परिस्थितीत शेवटच्या षटकात एक धाव घेण्यासाठी तो पळताना दिसला.
नेदरलंडला या सामन्यात विजयासाठी शेवटच्या षटकात 23 धावांची गरज होती. शेवटच्या षटकात कसाबशी पूर्ण केलेली एक धाव रोएल्फ बॅन डर मर्व (Roelof van der Merwe) याच्या खात्यात गेला नाही. कारण चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नव्हता. शेवटच्या षटकात नेदरलंडसाठी एक-एक चेंडू महत्वाचा होता. अशात ही एक धाव संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवण्यासाठी नक्कीच कामी आली. नेदरलंड संघाने शेवटच्या षटकापर्यंत 9 विकेट्स गमावल्या होत्या.
रोएल्फला आधीच दुखापत झाल्यामुळे तो मैदानात फलंदाजीसाठी येणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण वेदना होत असताना देखील तो मैदानात आला. त्यावेळी मॅक्स ओडाउड रोएल्फसोबत खेळपट्टीवर होता. ओडाउडने त्यावेळी 48 चेंडूत 66 धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर कायम होता. लाहिरु कुमार शेवटच्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर ओडाउटने एकही धाव घेतली नाही. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्यासाठी वेळ राहिला नव्हता. रोएल्फने कशीबशी ही एक धाव पूर्ण केली आणि त्याच्या वेदना अजूनच वाढल्या.
https://www.instagram.com/reel/Cj7XRFrsEoj/?utm_source=ig_web_copy_link
त्यानंतर षटकातील तिसऱ्या चेंडूवर ओडाउड स्ट्राईकवर होता. हा चेंडू त्याला बॅटवर घेता आला नाही, पण यष्टीरक्षकाच्या हातात जाईपर्यंत तो एक धाव घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर निघाला होता. यावेळी रोएल्फच्या चेहऱ्यावर त्याला होत असलेल्या वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. पण संघासाठी त्याने या वेदना सहन केल्या. असे असले तरी नेदरलंडला शया सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या तीन चेंडूंवर नेदरलंड संघाला अवघ्या चार धावा घेता आल्या. परिणामी श्रीलंकन संघाने 16 धावांच्या अंतराने विजय मिळवला. श्रीलंकन संघाने या विजयानंतर सुपर 12 फेरीसाठी स्वतःची जागा पक्की केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटने ‘या’ पोरीला बनवले सोशल मीडिया स्टार, एकाच फोटोमुळे झाली सगळीकडे व्हायरल
कार्तिक आणि पंत दोघेही संघात खेळू शकतात! गावसकरांनी समजावले प्लेइंग इलेव्हनचे गणित