पुणे : चीनमधील हाँगजाऊ शहरात २३ सप्टेंबर पासून एशियन गेम्स सुरू होत आहेत. यामध्ये वुशू क्रीडा प्रकारात रेफरी म्हणून सोपान कटके यांची निवड झाली आहे. २३ ते २८ सप्टेंबर या दरम्यान वुशू क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
सोपान कटके यांची संपूर्ण भारतातून निवड झाली आहे. कटके हे आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, साऊथ एशियन गेम्स, नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये रेफरी म्हणून काम केले आहे. ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे ते महासचिव आहेत. (Sopan Katke selected as referee for Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
गिल-ऋतुराजच्या धमाक्यानंतर ऑस्ट्रेलियाचे कमबॅक! श्रेयस पुन्हा अपयशी, झम्पा चमकला
BREAKING: 2024 टी20 वर्ल्डकपच्या तारखा घोषित, तब्बल 10 शहरात रंगणार स्पर्धा