सध्या सोनी टीव्हीवर लोकप्रिय रियालिटी शो ‘कोण बनेगा करोडपती’चा १३ वा हंगाम सुरू आहे. या कार्यक्रमात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात या दोन्ही खेळाडूंनी कार्यक्रमाचे निवेदक अमिताभ बच्चन यांच्यासोबत खूप मजा मस्ती केली. क्रिकेटचे अनेक मजेदार किस्से देखील या दोघांनी शेअर केले आणि प्रश्नांची उत्तरे दिली.
या कार्यक्रमादरम्यान गांगुली आणि सेहवाग यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना दोघेही संभ्रमात दिसत होते. एवढेच नाही तर, दोघांनी या प्रश्नाच्या उत्तरासाठी तज्ञांची मदत देखील घेतली.
हे दोघेही एका फाउंडेशनसाठी रक्कम गोळा करण्यासाठी या कार्यक्रमात आले होते. तसेच त्यांनी २५ लाख रुपये देखील जिंकले. या कार्यक्रमादरम्यान अनेक मजेशीर किस्से देखील या दोघांकडून सांगण्यात आले. या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी क्रिकेटची संबंधित एक प्रश्न केला होता. या प्रश्नचे उत्तर देण्यात दोघेही असमर्थ राहिले. विशेष म्हणजे हा प्रश्न महेंद्रसिंग धोनीबाबत होता.
या कार्यक्रमादरम्यान गांगुली आणि सेहवाग यांना केलेला प्रश्न असा होता की, “भारताचा असा कोणता माजी कर्णधार आहे, ज्याने त्याच्या कारकीर्दीत ट्रेविस डाऊलीन या खेळाडूची एकमात्र आंतरराष्ट्रीय विकेट घेतली?” ज्याला ४ पर्याय होते. ज्यामध्ये, १) महेंद्रसिंग धोनी, २) मोहम्मद अझरुद्दीन, ३) सुनील गावसकर आणि ४) राहुल द्रविड यांची नावं होती.
गांगुली आणि सेहवाग या प्रश्नावर सुरुवातीला खूप संभ्रमात होते. दोघांनीही या प्रश्नाचे दोन वेगवेगळे उत्तरे दिली. गांगुलीने सुनील गावसकर यांचे नाव घेतले. तर सेहवागने अझरुद्दीन यांचे नाव घेतले होते. यानंतर दोघेही एकमेकांसोबत असहमत होते, या संभ्रमानंतर दोघांनीही विशेष तज्ञांची मदत घेण्याचे ठरवले.
त्यानंतर तज्ञांनी या प्रश्नाचे उत्तर म्हणून महेंद्रसिंग धोनी असे सांगितले. यावर त्यांनी सांगितले की, महेंद्रसिंग धोनीने २००९ सालच्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये वेस्टइंडीजच्या ट्रेवीस डाऊलीनची एकमात्र विकेट घेतली होती. तेव्हा धोनीने दिनेश कार्तिकला यष्टीरक्षण करण्यास दिले होते.
या सामन्यात धोनीने आणखी एक विकेट घेतली होती. मात्र, मैदानातील पंचांनी त्या विकेटला नकार दिला. अशा पद्धतीने धोनीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकमात्र विकेट होती, ती म्हणजे ट्रेविस डाऊलीनची. तसेच सुनील गावसकर यांनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली होती. मात्र, ती विकेट जहीर अब्बास या खेळाडूची होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ च्या स्पर्धेच्या आधीच गांगुली निवृत्त झाला होता, तर सेहवाग दुखापतीमुळे खेळला नव्हता.
महत्वाच्या बातम्या –
–बुमराहने वाढवली टीम इंडियाची चिंता! चौथ्या कसोटीत गोलंदाजीदरम्यान घ्यावे लागले होते उपचार
–मुंबईकरने गाजवले ओव्हलचे मैदान! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित जगातील पहिलाच सलामीवीर
–‘मिस्टर आयपीएल’च्या खणखणीत षटकाराने लुटली मैफील, मागे थांबलेला धोनी बघतच राहिला