लखनऊ। पुढील महिन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात ५ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची क्रिकेट मालिका होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या १७ जणींच्या संघाची घोषणा रविवारी(२८ फेब्रुवारी) करण्यात आली आहे. या दोन्ही मालिका लखनऊमध्येच होणार आहेत.
या दोन्ही मालिकांसाठी सारखाच संघ निवडण्यात आला असून या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुन लुसला देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघाची नियमित कर्णधार डॅन वॅन निकर्क आणि क्लो ट्रायॉन या दोघी दुखापतग्रस्त असल्याने या मालिकांना मुकणार आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच भारताच पोहचला असून क्वारंटाईनमध्ये आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ७ मार्चपासून आधी वनडे मालिका होईल. त्यानंतर टी२० मालिका होणार आहे. या दोन्ही मालिका लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेने या मालिकांसाठी संघात मोठा बदल केलेला नाही. मागील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध निवडलेल्या १८ जणींच्या संघातील १७ जणींना भारताविरुद्धच्या सामन्यांसाठी संघात कायम ठेवले आहे. त्यातील केवळ मसाबाता क्लास दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका संघात सामील नाही. बाकी १७ जणी संघात कायम आहेत.
असा आहे दक्षिण आफ्रिका महिला संघ –
सुन लुस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनिम इस्माइल, लॉरा वोलवार्ट, तृषा चेट्टी, सिनालो जाफ्ता, तस्मीन ब्रिट्ज, मारिजेन कॅप, नोंडुमिसो शंगासे, लिजेल ली, एनेक बॉश, फाय टुनिक्लिफ, नोनकुलुलेको मलाबा, मिगनॉन डु प्रीज, नेडिन डी क्लर्क, लॉरा गुडॉल, टुमी शेखुखुने.
भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वनडे मालिकेचे वेळापत्रक –
7 मार्च – पहिला वनडे सामना – लखनऊ
9 मार्च – दुसरा वनडे सामना – लखनऊ
12 मार्च – तिसरा वनडे सामना – लखनऊ
14 मार्च – चौथा वनडे सामना – लखनऊ
17 मार्च – पाचवा वनडे सामना – लखनऊ
भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला टी20 मालिकेचे वेळापत्रक –
20 मार्च – पहिला टी20 सामना – लखनऊ
21 मार्च – दुसरा टी20 सामना – लखनऊ
23 मार्च – तिसरा टी20 सामन – लखनऊ
महत्त्वाच्या बातम्या –
-लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
यंदाच्या वर्षात भारत, इंग्लंडच्या खेळाडूंचा कसोटीत दबदबा, पाहा दोन महिन्यातील संघांची कामगिरी
‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा