---Advertisement---

अखेर ८२ षटकानंतर दक्षिण आफ्रिकेला मिळाली टीम इंडियाची पहिली विकेट…

On: गुरूवार, ऑक्टोबर 3, 2019 11:34 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना कालपासून(2 ऑक्टोबर) सुरु झाला आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे सुरु आहे. या सामन्यात आज(3 ऑक्टोबर) दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 59.1 षटके आणि बिनबाद 202 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.

आजही भारताकडून रोहित शर्माने 115 धावांपासून तर मयंक अगरवालने 84 धावांपासून पुढे खेळताना चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या दिडतासात दक्षिण आफ्रिकेला यश मिळू दिले नाही. यामध्ये मयंकने त्याचे पहिले कसोटी शतकही पूर्ण केले. तर रोहितने त्याचे दिडशतक पूर्ण केले.

पण मयंक आणि रोहितची भागीदारी भक्कम होत असतानाच 82 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने विकेट गमावली. रोहितला यष्टीरक्षक क्विंटॉन डी कॉकने केशव महाराजच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले. रोहितने या डावात 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले.

तसेच रोहित आणि मयंकमध्ये या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 317 धावांची भागीदारी झाली आहे. विशेष म्हणजे हे दोघे भारतात पहिल्यांदाच कसोटी सलामीवीर म्हणून मैदानात उतरले होते.

रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा विराट कोहली भेटतो त्याच्या ‘जबरा फॅन’ला…

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, रोहित ‘हिट’ है भाई…

विंडीजमध्ये संधी न मिळालेल्या त्या भारतीय खेळाडूबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment