काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचे माजी निवडकर्ते हुसेन माणक यांनी संघाचा माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सवर आरोप केला आहे. हा आरोप असा की, तो संघातील वर्णभेदाच्या आधारावर खेळाडूंची निवड करायचा आणि जेव्हा एबी डिव्हिलियर्स कर्णधार होता, तेव्हा त्याने सध्या संघाचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा काढण्याचा प्रयत्न केला.
पण डिव्हिलियर्सने आता या प्रकरणावर लक्ष दिले आहे आणि सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला की, त्याने नेहमीच संघाच्या हितासाठी काम केले आहे. जेव्हा तो कर्णधार होता तेव्हा त्याला स्वतः सर्व प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना संधी द्यायची होती. त्याच बरोबर डिव्हिलियर्सने हे देखील कबूल केले की, रबाडा हा जागतिक क्रिकेटमधील मोठ्या गोलंदाजांपैकी एक आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, “मला कधीही माझ्या कधीही संघातून रबाडाला बाहेर काढायचे नव्हते. असे बोलणे पूर्णपणे निर्थक आहे आणि तो जागतिक क्रिकेटच्या मोठ्या गोलंदाजांपैकी एक आहे.”
त्याच बरोबर संघ निवडकर्ता माणक म्हणाला की, त्यानंतर आफ्रिकन संघ २०१५ मध्ये भारतात आला होता आणि रबाडाला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तेव्हा संघाला काईल ऍबॉट आणि हरदास विल्जेन यांच्यापैकी एक खेळाडू निवडायचा होती. पण दोघांनाही संघात सामील करायचे होते, म्हणून त्याने रबाडाला वगळले.
कारण विचारल्यावर संघ व्यवस्थापनाने सांगितले की, रबाडा केवळ २० वर्षांचा आहे आणि त्याला फारसा अनुभव नाही. मात्र, एबी डिव्हिलियर्सने या सर्व आरोपांना फेटाळून लावत त्याच्या बाजूने गोष्टी साफ केल्या आहेत.
एबी डिव्हिलियर्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात २००४ पासून केली. त्याच बरोबर डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. शेवटचा सामना कसोटी सामना ऑस्ट्रेलिया सोबत खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“माझे नाव जर्सीवरून गायब होत असले, तरी मी हार मानणार नाही”