“१३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील” कबड्डीत भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय मिळवला आहे, तर पुरुषांची विजयी सुरुवात झाली आहे. एपीएफ हॉल, हल चौक, काठमांडू, नेपाळ येथे सुरू झालेल्या या स्पर्धेतील सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुषांच्या गटात भारताने श्रीलंकेला ४९-१६ अशी धूळ चारत साखळीतील पहिल्या विजयाची नोंद केली. मध्यांतराला २५-०८अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारतीयांनी मध्यांतरानंतर देखील त्याच जोशात खेळ करीत हा विजय सोपा केला.
महिलांत भारतीयांनी बांगलादेशवर ४७-१६ अशी सहज मात करीत साखळीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. शेवटची पाच मिनिटे राहिली असताना ३९-१४ अशी भारताकडे आघाडी होती.
भारतीय महिला संघाचा आता यजमान नेपाळ संघाबरोबरचा साखळीतील शेवटचा सामना बाकी आहे.
पुरुषांच्या इतर सामन्यात पहिल्या साखळी सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानने बांगलादेशवर ३७-२१ अशी मात करीत पहिल्या विजयाची नोंद केली. तर बांगलादेशने नेपाळवर ४३-१५ अशी मात करीत आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात यजमान नेपाळने श्रीलंकेला २८-२४ असे पराभूत करीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांना आजचा हा साखळीतील दुसरा विजय आहे. आता त्यांचा साखळीतील एक सामना बाकी आहे. तो भारताबरोबर असून गट विजेते व उपविजेते या करिता होईल. त्यामुळे हेच दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकतील.
किणीत होणार कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
वाचा????https://t.co/7khteS5oW2????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Kabaddi #KhelKabaddi— Maha Sports (@Maha_Sports) December 5, 2019
रहिमतपूर येथे होणार सातारा जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
वाचा????https://t.co/U4qxz6XZWe????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Kabaddi #KhelKabaddi— Maha Sports (@Maha_Sports) December 5, 2019