Loading...

हा खास व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने दिल्या बर्थ डे बॉय धवनला खास शुभेच्छा!

1985मध्ये जन्मलेला भारतीय संघाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) आज (5 डिसेंबर) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआय (BCCI) आयसीसीसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...

धवनने मीरा बाग, नवी दिल्ली (Meera Bagh, New Delhi) येथील सेंट मार्कच्या वरिष्ठ माध्यमिक पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने वयाच्या 12 व्या वर्षी क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

“सतत हसणारा आणि सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या @SDhawan25 ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बीसीसीआयने ट्विट केले. त्याचबरोबर बीसीसीआयने धवनचा खास व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवनचे अनेक गमतीशीर क्षण आहेत.

Loading...

तसेच “34 कसोटी, 133 वनडे, 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 9337 धावा धवनने केल्या आहेत. 2013 च्या आयसीसी चँपियन्स ट्राॅफीमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या धवनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे आयसीसीने (ICC) ट्विट करत धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच खेळाडूंमध्ये धवनचा संघसहकारी इशांत शर्माने एक खास व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत धवन आणि इशांत नाचताना दिसत आहेत.

Loading...
Loading...

त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही खास शैलीत धवनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शुभेच्छाचे ट्विट केले आहे की “मुछों को थोड़ा राउंड घुमाके | गब्बर के जैसा चौका लगा के|जन्मदिन मुबारक शिखर!”

Loading...

भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने धवनला शुभेच्छा देताना ट्विट केले आहे की ‘प्रत्येक क्षणी सदैव आनंदी असणारा हा व्यक्ती. सड्डा गब्बर, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप प्रेम’

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेरा जट्टा, नेहमी हसत रहा,” अश्या अनोख्या शब्दात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 2019 मधील विश्वचषकादरम्यानचा धवनसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा देणारे ट्वीट केले आहे.

धवन दुखापतग्रस्त असल्यामुळे तो शुक्रवारपासून (6 डिसेंबर) वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या टी20 मालिकेत खेळताना दिसणार नाही.

धवनने कसोटीत 2315 धावा, वनडे सामन्यात 5518 धावा आणि टी20मध्ये 1504 धावा केल्या आहेत.

अन्य खेळाडूंनी अशा दिल्या धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा – 

You might also like
Loading...