भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० आणि कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या दरम्यान टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने तस्त कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाचा १- ० ने धुव्वा उडवत मालिका आपल्या नावावर केली. आता २५ डिसेंबर पासून भारत – दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू जे या मालिकेत चमकदार कामगिरी करू शकतात.
१) मयांक अगरवाल –
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयांक अगरवालला भारतीय संघात स्थान मिळणे निश्चित आहे. त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १५० धावांची तुफानी खेळी केली होती. यापूर्वी तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. परंतु, मोक्याच्या क्षणी त्याने अप्रतिम खेळी करत पुनरागमन केले. जर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही संधी मिळाली, तर तो मोठी खेळी करू शकतो. त्याच्या कारकिर्दी बद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण १६ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४७.९३ च्या सरासरीने १२९४ धावा केल्या आहेत. यात ४ शतक आणि २ दुहेरी शतकांचा समावेश आहे.
२) श्रेयस अय्यर –
श्रेयस अय्यरला न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. श्रेयस अय्यर मध्यक्रमातील एक महत्वाचा फलंदाज आहे. ज्याप्रकारे त्याने या मालिकेत फलंदाजी केली आहे. त्यावरून त्याला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेत संधी मिळेल. यात काही शंका नाही. श्रेयस अय्यरने अवघ्या २ सामन्यात २०२ धावा केल्या आहेत.
३) अक्षर पटेल –
अक्षर पटेल हे नाव गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे. अक्षर पटेलला फेब्रुवारी महिन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. अक्षर पटेलने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३६ गडी बाद करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याने ५ वेळेस ५ पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ५२ आणि ४१ धावांची तुफानी खेळी केली होती. तर गोलंदाजी करताना या मालिकेत एकूण ९ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी स्थान दिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या
आता टिकाकारांची बसणार दातखिळी! ‘आऊट ऑफ फॉर्म’ हार्दिकने फिटनेसवर सुरू केलंय काम- Video