आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इंग्लंड क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट मंडळला त्यांच्या १००० व्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.
या मालिकेतील बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणारा पहिला सामना इंग्लंड क्रिकेट संघाचा १००० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे.
कसोटी क्रिकेटमधील या उपलब्धी बद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी इंग्लंड संघाला शुभेच्छा दिल्या.
“इंग्लंड क्रिकेट संघाला त्यांच्या एेतिहासिक १००० व्या कसोटी सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडू मी शुभेच्छा देतो. मला आशा आहे की इथून पुढेही इंग्लंड चांगले कसोटी क्रिकेटपटू घडवेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेल ज्याचा आदर्श घेउन जगभरातून असंख्य उत्कृष्ठ क्रिकेटपटू घडतील.” असे आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले.
या मिलिकेतील बर्मिंघहम येथील पहिल्या सामन्यात इंग्लंड जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च विक्रम प्रस्थापित करणार आहे.
हा सामना इंग्लंडसाठी १००० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना ठरणार आहे.
याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर १००० वा कसोटी सामना खेळणारा इंग्लंड पहिला देश ठरेल.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १८७७ मध्ये पहिला कसोटी सामना झाला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र
–षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ