सोमवारी (दि. 15 मे) सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल 2023च्या 62व्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून 34 धावांनी पराभवाचा धक्का बसला. यासोबतच ते प्ले-ऑफमधील शर्यतीतूनही बाहेर पडले. या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करम याने मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, ब्रेकदरम्यान त्यांना वाटले की, त्यांच्याकडे संधी आहे, पण पॉवरप्लेमध्ये चार विकेट्स गमावल्यानंतर त्यांना सामना गमावला.
काय म्हणाला मार्करम?
सामना गमावल्यानंतर एडेन मार्करम (Aiden Markram) म्हणाला होता की, “ब्रेकदरम्यान विश्वास होता की, आमच्याकडे अजूनही संधी आहे, पण आम्ही पॉवरप्लेमध्ये 4 विकेट्स गमावून सामनाही गमावला.” गोलंदाजीतही पॉलरप्लेमध्ये हैदराबादची खराब सुरुवात झाली. त्यावर मार्करम म्हणाला की, “आमच्याकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत आणि आम्हाला वाटले की, चेंडू काही वेळासाठी स्विंग होईल, पण तसे झाले नाही. गिलने चांगली कामगिरी केली.”
गोलंदाजांचं कौतुक करताना गिल म्हणाला की, “आम्हाला पुनरागमन करून देण्याचे श्रेय भुवनेश्वर कुमारला जाते. क्लासेन शानदार खेळाडू आहे, ज्याच्याकडे दर्जा, ताकद आणि क्रिकेटची चांगली जाण आहे. दुर्दैवाने संघाच्या इतर खेळाडूंनी त्याची साथ दिली नाही.”
सामन्याचा आढावा
गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी शुबमन गिल याने 58 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. त्याने यावेळी साई सुदर्शन (47) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी रचली. तसेच, 9 विकेट्स गमावत 188 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त गुजरातच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार याने 30 धावा खर्च करत 5 विकेट्स आणि टी नटराजन याने 34 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. त्यांनी अखेरच्या षटकांमध्ये संघाला पुनरागमन करण्यात मदत केली. गुजरातने यावेळी 8 षटकात 57 धावाच केल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघ मोहम्मद शमी (20 धावांवर चार विकेट्स) आणि मोहित शर्मा (28 धावांवर चार विकेट्स) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही. एकट्या हेन्रीच क्लासेन (64) याने चांगली फलंदाजी केली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबाद संघ 154 धावाच करू शकला. क्लासेन याने भुवनेश्वर कुमारसोबत (27) आठव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. हैदराबाद संघाने पॉवरप्लेमध्ये 4 विकेट्स गमावत 45 धावाच केल्या होत्या. (srh skipper aiden markram said we lose match in powerplay)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने शतक ठोकताच विराटची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘पुढे जा आणि नव्या पिढीचे…’
BREAKING: आर्चरला भोवले आयपीएल खेळणे, दुखापतीमुळे झाला ऍशेस मधून ‘आऊट’