भारत आणि श्रीलंका यांच्यात याच महिन्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. परंतु ही मालिका सुरू होण्याअगोदरच यजमान संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने मालिकेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. याबरोबर श्रीलंका संघाने त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्येही मोठा बदल केला आहे.
इंग्लंड दौर्यावरुन परतल्यानंतर श्रीलंका संघाचे नियमित फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या त्यांना विलगिकरणात ठेवले आहे. याच कारणामुळे फ्लॉवर यांना भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या एकदिवसीय मालिकेदरम्यान संघाबरोबर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहता येणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत बोर्डाने फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी 19 वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक दामिका सुदर्शना यांना निवडले आहे. सोमवारी (१२ जुलै) याची माहिती मिळाली की, तातडीने दामिका यांना संघाचे प्रभारी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
फलंदाजी प्रशिक्षक फ्लॉवर यांच्याबरोबरच डाटा अॅनालिस्ट जीटी निरोशनचा देखील कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. श्रीलंकेबरोबर खेळल्या गेलेल्या मालिकेनंतर इंग्लंड संघातील सात सदस्यांसह तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर पाकिस्तानबरोबर मालिका खेळण्यापूर्वी इंग्लंडचा संघ नव्याने निवडला गेला आहे. बेन स्टोक्सला या संघाचे कर्णधार बनविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंड संघात तब्बल 9 खेळाडूंना प्रथमच स्थान देण्यात आले आहे.
दुसरीकडे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील एकदिवसीय मालिका 13 जुलैपासून सुरू होणार होती. मात्र आता कोरोनामुळे 18 जुलैपासून हे सामने खेळले जाणार आहेत. तर 29 जुलै रोजी तिसऱ्या टी20 सामने हा दौरा संपेल.
भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका आणि टी 20 मालिकेचे नवीन वेळापत्रक
18 जुलै – पहिला एकदिवसीय सामना, कोलंबो
20 जुलै – दुसरा एकदिवसीय सामना , कोलंबो
23 जुलै – तिसरा एकदिवसीय सामना, कोलंबो
25 जुलै – पहिला टी 20 सामना, कोलंबो
27 जुलै – दुसरा टी -20 सामना, कोलंबो
29 जुलै – तिसरा टी -20 सामना, कोलंबो
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका बोर्डाने घोषित केली भारत-श्रीलंका सामन्यांची वेळ, पाहा किती सुरू होणार मॅच?
भारतीय महिलांच्या आनंदावर विरजण, सामना विजयानंतर आयसीसीने ठोठावला दंड; वाचा कारण
श्रीलंका दौऱ्यात पंड्या बंधू आणि चाहर बंधू एकत्र खेळल्यास तब्बल ८७ वर्षांनी होणार ‘असा’ कारनामा