---Advertisement---

शुबमन गिल भारताता नवा कसोटी कर्णधार..! पण ‘या’ स्टार खेळाडूंनाच दाखवला बाहेरचा रस्ता

On: शनिवार, मे 24, 2025 2:44 PM
---Advertisement---

India’s Test squad announced: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्याच वेळी युवा फलंदाज शुबमन गिलकडे (Shubman Gill) कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली आहे. (Shubman Gill India’s New Test Captain) त्याच वेळी, स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळालेले नाही. (Shreyas Iyer and Mohammed Shami dropped from the team)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुबमन गिलकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. तर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. (Rishabh Pant Team India’s Vice Captain) आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची कसोटी संघात निवड करण्यात आलेली नाही. तो आयपीएल 2025 मध्ये उत्तम फॉर्ममध्ये दिसला होता. यापूर्वी, तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील भारतीय संघाचा हिरो होता.

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपात 6 गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव असे 3 फिरकीपटू आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरची निवड झाली आहे. नायर 8 वर्षांनी कसोटी संघात परतला आहे. त्याने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. (Karun Nair returns to the Indian team after 8 years)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा 18 सदस्यीय संघ – शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---