चिल्डरन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, वर्सोवा, अंधेरी येथे ही स्पर्धा होणार आहे. आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी स्पर्धेला सुरुवात होईल. आज पहिल्या दिवशी पहिल्या फेरीचे (उपांत्यपूर्व फेरीचे) सामने खेळवण्यात येतील. तर दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरी, तिसरे स्थान व अंतिम फेरीचे सामने पार पडतील.
सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ विभागातील विभागीय स्पर्धेतील विजेत्या संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. कोल्हापूर, लातूर, अमरावती, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे व औरंगाबाद असे ८ विभागातील मुलाचे ८ व मुलीचे ८ संघानी भाग घेतला आहे.
स्पर्धेसाठी दोन मातीची मैदाने तयार करण्यात आली असून प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व चिल्डरन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, वर्सोवा यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.